---Advertisement---

MPSC परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर ; जाणून घ्या तारखा

On: January 11, 2021 2:57 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई । कोरोना आणि इतर कारणांमुळे पुढे ढकलेल्या गेलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या तारखा आयोगानं जाहीर केल्या आहेत.

त्यानुसार राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 चे आयोजन 14 मार्च 2021 रोजी करण्यात येणार आहे. तर महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 27 मार्च 2021 ला होणार आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 ही 11 एप्रिल 2021 रोजी होईल. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं आज प्रसिद्धीपत्रक जारी करुन ही माहिती दिली आहे.

कोरोनामुळे एमपीएससीच्या परिक्षा झाल्या नसल्याने अनेक विद्यार्थी निराश झाले होते. दरम्यान, युपीएससीच्या परिक्षा मार्गी लागल्या तरीही महाराष्ट्र लोकसेवा आयोग तारखा जाहीर करत नसल्यामुळे टीका देखील करण्यात येत होती. 11 ऑक्टोबर 2020 रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा मराठा आरक्षणप्रश्नी मराठा संघटनांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे पुढे ढकलण्यात आली होती. या पार्श्‍वभूमिवर आज विविध परिक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!