---Advertisement---

विधानभवन परिसरात बॅनरबाजी : गजनी सरकार, विसरभोळा कारभार !

By team
On: July 1, 2025 10:54 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील सरकारचे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दूसरा दिवस असून आज विरोधक शक्तिपीठ महामार्गावरून सरकारला घेरू शकतात. तसेच ज्या जिल्ह्यांमधून शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे, त्या भागातील शेतकरी व स्थानिक आंदोलन करणार असल्याची माहिती आहे. तसेच बीडमध्ये विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या मुद्दा सभागृहात व बाहेर देखील तापण्याची शक्यता आहे. मुंबईतल्या मुंब्रा येथे झालेल्या लोकल अपघाताचा देखील प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जाण्याची शक्यता आहे.

गजनी सरकार, विसरभोळा कारभार असे रोहित पवारांकडून विधानभवन परिसरात बॅनरबाजी करण्यात आली. रोहित पवार म्हणाले, आज विधिमंडळात कृषी दिन साजरा केला जाणार आहे. पण हे जे गजनी सरकार आहे, विसरभोळा कारभार अशी यांची परिस्थिती आहे. सरकारमध्ये असणाऱ्या सर्व नेत्यांनी जाहीर केले होते की आम्ही 7-12 करू. पण ती फक्त घोषणाच राहिली, त्यावर काहीही झाले नाही. तसेच सन्मान निधी 3 हजार वाढ करू, शेतकऱ्यांची कर्जमाफी, पीक विमा, कशी मदत करणार आहे याबद्दल सरकारने सांगितले नाही.

रोहित पवार म्हणाले, आज विधीमंडळात कृषीदिन साजरा केला जाणार आहे. पण हे जे गजनी सरकार आहे, विसरभोळा कारभार अशी यांची परिस्थिती आहे. सरकारमध्ये असणाऱ्या सर्व नेत्यांनी जाहीर केले होते की आम्ही 7-12 करू. पण ती फक्त घोषणाच राहिली, त्यावर काहीही झाले नाही. तसेच सन्मान निधी 3 हजार वाढ करू, शेतकऱ्यांची कर्जमाफी, पीकविमा, कशी मदत करणार आहे याबद्दल सरकारने सांगितले नाही.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!