---Advertisement---

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना मोठा दिलासा !

By team
On: July 3, 2025 5:12 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आता नवा ट्विस्ट समोर आला आहे. या प्रकरणात आदित्य ठाकरेंना क्लीन चिट मिळाली आहे. दिशाची हत्या झाल्याचे किंवा तिच्यावर कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झाल्याचे पुराव्यांतून सिद्ध झालेले नाही, असे पोलिसांनी म्हटले आहे.

सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियनची हत्या झाल्याचे किंवा तिच्यावर कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झाल्याचे वैद्यकीय आणि वैज्ञानिक पुराव्यांतून सिद्ध झालेले नाही, अशी माहिती मुंबई पोलिसांनी उच्च न्यायालयात दिली. दिशा सालियनच्या वडिलांनी केलेल्या याचिकेत शिवसेना (ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आला होता.

या याचिकेवर पोलिसांनी हे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. दिशाची हत्या झाल्याचा आणि त्यापूर्वी तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा दावा करून प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीसाठी तिचे वडील सतीश सालियन यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे ही याचिका सुनावणीसाठी आली. त्यावेळी मालवणी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांनी या प्रकरणी प्रतिज्ञापत्र दाखल केले. या प्रतिज्ञापत्रात सतीश यांनी केलेल्या दाव्यांचे खंडन केले आहे. प्रतिज्ञापत्रात घटनेच्या दिवशी नेमके काय घडले हे नमूद केले आहे. तसेच घटनेच्या वेळी दिशासह असलेला तिचा प्रियकर आणि मित्रांनी दिलेल्या जबाबात सत्य असल्याचे म्हटले आहे.

सूडबुद्धीने याचिका – आदित्य ठाकरे
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी निर्णय देण्याआधी आपली बाजू ऐकून घ्यावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांच्या वतीने उच्च न्यायालयात करण्यात आली. ठाकरे यांनी हस्तक्षेप याचिकेद्वारे ही मागणी केली. या प्रकरणी आपण प्रतिवादी नसलो तरीही आपलं नाव राजकीय सूडबुद्धीने गोवण्यात आले आहे. आपल्याविरोधात द्वेषाने, वैयक्तिक आणि राजकीय सूड उगवण्यासाठी खोटी, निरर्थक याचिका केल्याचा दावाही ठाकरेंनी केला आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!