अक्कलकोट : प्रतिनिधी
या जगाला सुखी व्हायचे असेल तर, हरी नामा शिवाय पर्याय नांही, मीपणा व अहंकार अंगिकारल्यामुळे माणसाच्या जीवनाचा अंत होतो. या दोन गोष्टी पासून माणूस लांब राहिल्यास आनंद व समाधान मिळते असे परखड विचार राष्ट्रीय किर्तनकार व धर्म प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख, इंदोरीकर यांनी व्यक्त केले.
ते श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाच्या ३८ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सवनिमित्त न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली होत असून, शनिवारी राष्ट्रीय किर्तनकार व धर्म प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख, इंदोरीकर (संगमनेर, अकोलेकर) यांच्या ‘किर्तन’ कार्यक्रमाने ६ वे पुष्प संपन्न झाले.
या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन राष्ट्रीय किर्तनकार व धर्म प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख, इंदोरीकर व न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान श्रींची प्रतिमा, नटराज, व स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी निवृत्ती महाराजांचे स्वीय सहायक किरण शेटे, मंगेश उपासे, रामेश्वर जाधव, गणेश महाराज हे उपस्थित होते. यावेळी अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोलबापू शिंदे, उद्योगपती दत्ताआण्णा सुरवसे हे उपस्थित होते.
प्रारंभी न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी व संजय कुलकर्णी यांच्या हस्ते मंत्र पठणाने पूजन संपन्न झाले. या कीर्तनाला श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था पंढरपूर च्या वारकऱ्यांनी साथ दिली. यांच्या समवेत तालुक्यातील कोळेकरवाडी येथील ह.भ.प.चंद्रकांत डांगे हे उपस्थित होते.
पुढे बोलताना राष्ट्रीय किर्तनकार व धर्म प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख, इंदोरीकर यांनी आई-वडील, संत भगवंत या शिवाय माणसाचे जिवन शून्य असून, सध्याच्या विविध घडामोडीवर वृत्ती, वल्ली व कृती या बाबतचे कलियुगातील दाखले देत सडेतोड व परखड विचार व्यक्त करत भक्ती, शक्ती, धर्म-संस्कार प्रबोधन या त्रिवेणी संगमात लाख भक्तजनांना आनंदाचे डोही आनंद तरंग अशी अनभुती दिली. प्रचंड गर्दीमुळे न्यासाच्या परिसरात ठिकठिकाणी स्क्रीनद्वारे प्रक्षेपण करण्यात आले होते.
अन्नछत्र हे स्वामींचा परिसर :
न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या अन्नछत्र हे मनोभावे सेवा करणारे संस्था आहे. या माध्यमातून धार्मिक कार्य बरोबरच अन्य उपक्रम देखील हे उल्लेखनीय रित्या
राबविल्या जात आहेत.
परखडपणे समाज प्रबोधन :
राष्ट्रीय किर्तनकार व धर्म प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्त महाराज यांनी संत तुकाराम, एकनाथ, निवृत्ती महाराज, ज्ञानदेव, मुक्ताबाई, सोपान व ज्ञान, देव, ध्यान, नम्रता, लक्ष्मी,मी पणा, संपत्ती, दया, संत देव, सुख समाधान याबाबत उदाहरणासह अभंगातील दाखला देत मन मुराद, उपस्थितांनी टाळ्यांचा गजरात सद्य स्थितीवर त्यांनी परखडपणे समाज प्रबोधन केले. श्रीक्षेत्र अक्कलकोट हे गुरु पीठ आहे. या गुरु पिठात अन्नछत्राच्या माध्यमातून सुरु असलेले महाप्रसादा बरोबरच विविध उपक्रमाचे कौतुक केले.
आज होणार हे कार्यक्रम :
दि. ६ जुलै रोजी रविवार सायंकाळी ७ ते रात्रौ ९.३० पर्यंत “महाराष्ट्राचे हास्य जत्रा” सादरकर्ते समीर चौगुले, ओंकार राऊत, अरुण कदम, प्रभाकर मोरे, वनित खरात, पृथ्वीक प्रताप, प्रियदर्शन इंदलकर, शिवली परब यांचा धमाल उडवणारा कार्यक्रम होणार आहे.
यावेळी न्यासाचे विश्वस्त अलकाताई जनमेजयराजे भोसले, अर्पिताराजे अमोलराजे भोसले, गीतांजली अमोलबापू शिंदे सोलापूर, माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे, स्वाती निकम, कु. तेजस्विनीराजे अमोलराजे भोसले, कु. स्वामिनीराजे अमोलराजे भोसले, स्मिता कदम, पल्लवी कदम, उज्वला भोसले, संगीता भोसले, रूपा पवार, स्वप्ना माने, कविता वाकडे, सुवर्णा घाडगे, राजश्री माने, सुनंदा अष्टगी, क्रांती वाकडे, अनिता गडदे, रोहिणी देशपांडे, धनश्री पाटील, दिव्या मोरे, कल्पना मोरे, अक्षता मोरे, कोमल क्षीरसागर, शितल क्षीरसागर, अक्षता खोबरे, रुपाली भोसले, व न्यासाचे उपाध्यक्ष- अभय खोबरे, सचिव- शामराव मोरे, कु. हर्षवर्धनराजे अमोलराजे भोसले, विश्वस्त- लक्ष्मण पाटील, लाला राठोड, संतोष भोसले, राजेंद्र लिंबीतोटे, मनोज निकम, अहिल्यानगराचे अशोकराव घुल्ले, शिवराज स्वामी, सिद्धेश्वर मोरे, बाळासाहेब कुलकर्णी बबलादकर, दिलीपभाऊ सिद्धे, दत्ता जाधव, महेश शिर्के, युवराज व श्रीकांत माळगे, मैनुद्दीन कोरबू, अश्पाक काझी, असद फुलारी, शरणप्पा अचलेर, स्वामिनाथ गुरव, ओंकारेश्वर उटगे, प्रभाकर मजगे, अँड.संतोष खोबरे, रोहित खोबरे, अरविंद शिंदे, अप्पा हंचाटे, सौरभ मोरे, बसवराज माशाळे, राजु नवले, शितल जाधव, चंद्रकांत सोनटक्के, बालाजी पाटील, निखील पाटील, अप्पू कलबुर्गी, आकाश शिंदे, रोहन शिर्के, सागर गोंडाळ, प्रा. सायबण्णा जाधव, अतिश पवार, प्रवीण घाडगे, गोटू माने, आकाश गंगणे, बाळासाहेब घाटगे, बाळासाहेब पोळ, कुमार सलबत्ते, शहाजीबापू यादव, कुमार पाटील, सतीश महिंद्रकर, दत्ता माने, आकाश शिंदे, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, श्रीनिवास गवंडी, लक्ष्मण बिराजदार, महांतेश स्वामी, संजय गोंडाळ, प्रसाद मोरे, वैभव मोरे, फहीम पिरजादे, केदार तोडकर, योगेश पवार, आकाश सूर्यवंशी, विनायक भोसले, भरत राजेगावकर, मल्लिकार्जुन बिराजदार, प्रा. शरणप्पा आचलेर, प्रशांत साठे, गोविंदराव शिंदे, ज्ञानेश्वर भोसले, समर्थ चव्हाण, सुमित कल्याणी, राहुल इंडे, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, विठ्ठलराव रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण, श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी अविनाश मडीखांबे यांच्या वाढदिवसानिमित्त न्यासाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन श्वेता हुल्ले यांनी केले तर न्यासाचे सचिव शामराव मोरे यांनी रसिकप्रेक्षकांचे स्वागत व आभार मानले. उत्कृष्ठ लाईट व्यवस्था शंभूराजे इलेक्ट्रिकल व मंडप सजावट कल्लप्पा छकडे यांनी केले.