अक्कलकोट : प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचा ३८ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सव न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली होत असून, सोमवारी ‘शरण-गुरु-चरण’ नृत्यशैली मधून गुरु वंदन, सादरकर्ते- गुरु आभा वांबूरकर, गुरु स्मिता महाजन आणि शिष्यवर्ग, पुणे यांच्या कार्यक्रमाने ८ वे पुष्प संपन्न झाले. या सदाबहार आगळ्या – वेगळ्या नृत्य कार्यक्रमाने श्रोतेगणं भारावून गेले. या कार्यक्रमास श्रोत्यांनी प्रचंड गर्दी केलेली होती. या नृत्यामध्ये भरत नाट्यम, कथक, कथकली, मणिपुरी, ओडिसी, कुचीपुडी, मोहिनीअट्टम, सत्रिया याबरोबरच लोकनृत्य आदी नयनरम्य अदाकारी सादर केले.
दरम्यान या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन यतीन सुभाष शहा, चेअरमन, प्रिसिजन कॅमशाफ्ट, सोलापूर, सुहासिनी यतीन शहा, अध्यक्षा, प्रिसिजन फौंडेशन, सोलापूर, भाजपा शहर अध्यक्ष सोलापूर- रोहिणी तडवळकर, धनंजय महाराज पुजारी, श्री स्वामी समर्थ समाधी मठ, अक्कलकोट, डॉ. मंजुषा मेंथे, डॉ. सायली बंदीछोडे, अचिंतकुमार, रिजनल मॅनेजर, सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, सोलापूर, आबासाहेब विष्णू डीसले, शाखाधिकारी, युनियन बँक ऑफ इंडिया, अक्कलकोट, राजेश निलवाणी, राजेंद्र लिंबीतोटे, विश्वस्त श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, जेष्ठ नेते मल्लिनाथ स्वामी, दत्तकुमार साखरे, भाऊसाहेब घाडगे, फैजअहमद उर्फ नन्नु कोरबू, जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक विभाग, आप्पासाहेब पाटील, उपसभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती अक्कलकोट, चंद्रशेखर मडीखांबे, सामाजिक कार्यकर्ते, वर्षा सिद्धाराम भंडारकवठे, अंकुश चौगुले, सामाजिक कार्यकर्ते, सुनिल खवळे, सामाजिक कार्यकर्ते, लखन झंपले, सामाजिक कार्यकर्ते, ऋतुराज उर्फ बंटी राठोड, सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी श्रींची प्रतिमा, नटराज व स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी सादरकर्ते – गुरु आभा वांबूरकर, गुरु स्मिता महाजन यांच्यासह मान्यवरांचा न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला. न्यासाचे पुरोहित सोमकांत व संजय कुलकर्णी यांच्या हस्ते मंत्र पठणाने पूजन संपन्न झाले.
गुणीजन गौरव : डॉ. रामलिंग काशिनाथ पुराणे, मुरूम सामाजिक, राजू जिवलु पवार, चालक, एस.टी.महामंडळ अक्कलकोट, इम्रान गफूर पठाण, वायरमन, एमएसईबी, अक्कलकोट यांचा न्यासाच्या वतीने गुणीजन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
गुणवंत विद्यार्थी गौरव : तालुक्यातील इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत उत्तम गुण मिळवलेल्या ७ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव न्यासाच्या वतीने करण्यात आला.
आज होणारे कार्यक्रम : मंगळवार दि. ८ जुलै रोजी सायंकाळी ७ ते रात्रौ ९.३० पर्यंत स्वामिनी प्रस्तुत ‘रजनी गंधा’ मराठी व हिंदी गीतांचा कार्यक्रम सादरकर्ते – संदीप पाटील आणि सहकारी पुणे यांचा कार्यक्रम सादर होणार आहे.
संस्कृती परंपरा जपण्याचे महत्वपूर्ण कार्य:
न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या आठ दिवसापासून धर्मसंकिर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत. हे आनंदाची बाब आहे या कार्यक्रमात शास्त्रीय नृत्याला देखील महत्व देत ‘शरण-गुरु-चरण’ हे कार्यक्रम करण्याची संधी या निमित्ताने मिळालेली आहे. अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून संस्कृती परंपरा जपण्याचे महत्वपूर्ण कार्य होत आहे.
सादरकर्ते- गुरु आभा वांबूरकर,
यावेळी न्यासाचे विश्वस्त अलकाताई जनमेजयराजे भोसले, अर्पिताराजे अमोलराजे भोसले, माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे, स्वाती निकम, कु. तेजस्विनीराजे अमोलराजे भोसले, कु. स्वामिनीराजे अमोलराजे भोसले, स्मिता कदम, पल्लवी कदम, उज्वला भोसले, संगीता भोसले, रूपा पवार, स्वप्ना माने, कविता वाकडे, सुवर्णा घाडगे, राजश्री माने, सुनंदा अष्टगी, क्रांती वाकडे, अनिता गडदे, रोहिणी देशपांडे, धनश्री पाटील, दिव्या मोरे, कल्पना मोरे, अक्षता मोरे, कोमल क्षीरसागर, शितल क्षीरसागर, अक्षता खोबरे, रुपाली भोसले, व न्यासाचे उपाध्यक्ष- अभय खोबरे, सचिव- शामराव मोरे, कु. हर्षवर्धनराजे अमोलराजे भोसले, विश्वस्त- भाऊ कापसे, संदीप फुगे-पाटील, लक्ष्मण पाटील, रामचंद्रराव घाटगे, संतोष भोसले, राजेंद्र लिंबीतोटे, मनोज निकम, बाळासाहेब कुलकर्णी बबलादकर, मैनुद्दीन कोरबू, अश्पाक काझी, प्रवीण देशमुख, स्वामिनाथ गुरव, ओंकारेश्वर उटगे, अँड.संतोष खोबरे, रोहित खोबरे, अरविंद शिंदे, अप्पा हंचाटे, सौरभ मोरे, राजु नवले, शितल जाधव, अनिकेत सोनटक्के, बालाजी पाटील, निखील पाटील, रोहन शिर्के, अतिश पवार, प्रवीण घाडगे, गोटू माने, बाळासाहेब घाटगे, बाळासाहेब पोळ, कुमार सलबत्ते, लक्ष्मण विभूते, किरण जाधव, अशोक स्थावरमठ, राजाभाऊ मलंग, शहाजीबापू यादव, कुमार पाटील, सतीश महिंद्रकर, दत्ता माने, उमेश येळसंगी, आकाश शिंदे, यश विभूते, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, श्रीनिवास गवंडी, लक्ष्मण बिराजदार, महांतेश स्वामी, संजय गोंडाळ, प्रसाद मोरे, वैभव मोरे, फहीम पिरजादे, केदार तोडकर, योगेश पवार,रमेश हेगडे, तानाजी पाटील, राजू पवार, आकाश सूर्यवंशी, शुभम सावंत, लक्ष्मण विभूते, प्रीतेश किलजे, समर्थ घाडगे, विनायक भोसले, भरत राजेगावकर, मल्लिकार्जुन बिराजदार, प्रा. शरणप्पा आचलेर, प्रा. मनोज जगताप, प्रा. प्रकाश सुरवसे, प्रशांत साठे, स्वामिनाथ बाबर, गोविंदराव शिंदे, ज्ञानेश्वर भोसले, समर्थ चव्हाण, सुमित कल्याणी, राहुल इंडे, विशाल घाडगे, धनंजय निंबाळकर, विठ्ठलराव रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण, श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन श्वेता हुल्ले यांनी केले तर न्यासाचे सचिव शामराव मोरे यांनी रसिकप्रेक्षकांचे स्वागत व आभार मानले. उत्कृष्ठ लाईट व्यवस्था शंभूराजे इलेक्ट्रिकल व मंडप सजावट कल्लप्पा छकडे यांनी केले.