---Advertisement---

उज्ज्वल निकमांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून निवड !

By team
On: July 13, 2025 10:18 AM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशातील ज्येष्ठ सरकारी वकील उज्वल निकम यांना मोठी संधी देण्यात आली आहे. राष्ट्रपती नामनिर्देषित खासदार म्हणून उज्वल निकम यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे. अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये उज्वल निकम यांनी काम पाहिले असून ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे.

उज्वल निकम यांनी 2024 च्या लोकसभेला उज्जल निकम यांनी उत्तर मध्य मुंबईतून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी पराभव केला. त्यानंतर आता निकम यांची राज्यसभेवर वर्णी लागली आहे. उज्वल निकम यांच्यासोबत तीन जणांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

चार जणांना खासदारपदी निवड

  • हर्षवर्धन श्रृंगला – भारताचे माजी परराष्ट्र सचिव
  • डॉ. मीनाक्षी जैन – इतिहासाच्या क्षेत्रातील ख्यातनाम अभ्यासक
  • सी. सदानंदन मास्टर – केरळमधील प्रसिद्ध समाजसेवक आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ
  • अ‍ॅड. उज्ज्वल निकम – विशेष सरकारी वकील

उज्वल निकम यांचे मूळगाव जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील माचले गावचे आहेत. तेथेच त्यांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण झाले. जळगाव येथील एसएस मणियार लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली आहे. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यासह अनेक महत्त्वाच्या केसेस मध्ये सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांनी काम पाहिले होते.

गुलशन कुमार हत्याकांड, प्रमोद महाजन हत्या, 2008 मध्ये मुंबईवर झालेला हल्ला, कोपर्डी बलात्कार या हायप्रोफाईल केसमध्ये त्यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात देखील सरकारी विशेष सरकरी वकील म्हणून ते काम पाहत आहेत.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!