---Advertisement---

कमी बोला, जास्त काम करा ; एकनाथ शिंदेंनी टोचले नेत्यांचे कान !

By team
On: July 15, 2025 10:30 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील काही नेतेमंडळी मागील काही दिवसांपासून अडचणीत सापडले आहेत. भरत गोगावले यांचा आघोरी पूजा करतानाचा व्हिडीओ समोर आलेला असताना आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन मॅनेजरला केलेली मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला. यांनतर पैशाने भरलेलया बॅगेचा मंत्री संजय संजय शिरसाट यांचा व्हायरल व्हिडिओ व्हायरल झाल्याने विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीका सुरु झाली. या सर्व गोष्टींमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचं बोलले जाते. बातम्यांमध्ये सातत्याने शिंदेसेनेच्या नेत्यांची वादग्रस्त विधाने आणि कृत्य झळकत असल्याने पक्षाच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी ने ते, पदाधिकारी यांना कानपिचक्या दिल्या.

सोमवारी दादर येथे एकनाथ शिंदे यांनी पक्षातील नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत ते म्हणाले की, “मागील काळात ज्या घटना घडल्या त्यामुळे लोक तुमच्यावर नाही तर माझ्यावर प्रश्न उभे करतात. मला विचारले जाते, तुमचे आमदार काय करतायेत? काही मंत्र्यांना बदनामीमुळे घरी जावे लागले. मला तुमच्यावर कारवाई करायला आवडत नाही परंतु जर कुणी तशी वेळ आणली तर मी करेन,” असा इशारा त्यांनी वादग्रस्त नेत्यांना दिला.

“चुकीच्या गोष्टींसाठी ऊर्जा खर्ची घालू नका. कमी बोला, जास्त काम करा. आपण एकाच कुटुंबातील आहोत. तुमची बदनामी ती माझी बदनामी आहे. मी प्रमुखासारखं वागत नाही, मी स्वत:ला कार्यकर्ता मानतो. कितीही पदं मिळाली तरी कार्यकर्ता आहे, असंच समजून कामं करा . तुमच्याकडूनही मला ती अपेक्षा आहे. आपल्याला खूप कमी कालावधीत मोठे यश मिळाले आहे. काही जण आपली प्रतिमा मलिन करण्याचा कट रचत आहेत. येणाऱ्या काळात आपली परीक्षा असेल. सामाजिक जीवनात वावरताना काळजी घ्या,” असंही एकनाथ शिंदे यांनी नेत्यांना सांगितले.

राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी निकृष्ट जेवणासाठी जबाबदार धरत आमदार निवासस्थानातील कॅन्टीन मॅनेजरला मारहाण केली. त्याशिवाय सरकारमधील मंत्री संजय शिरसाट यांचाही एक व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओत एका पलंगावर बसून शिरसाट सिगारेट ओढत होते आणि शेजारी पैशांनी भरलेली बॅग होती असा व्हिडिओ समोर आल्यानंतर शिरसाट अडचणीत सापडले. या सर्व प्रकारामूळॆ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा होत आहे. यादरम्यान आता शिंदे यांनी नेत्यांना कडक शब्दात सुनावले आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!