---Advertisement---

ज्येष्ठ पत्रकार कै. अविनाश व्यंकटेश कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा पहिला ‘आदर्श पत्रकार पुरस्कार’ प्रशांत जोशी यांना प्रदान

By team
On: July 15, 2025 3:10 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

ज्येष्ठ पत्रकार कै. अविनाश व्यंकटेश कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा पहिला ‘आदर्श पत्रकार पुरस्कार’ दैनिक संचारचे वरिष्ठ उपसंपादक प्रशांत जोशी यांना महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे व ज्येष्ठ विचारवंत रवींद्र मोकाशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार वितरण सोहळा आज श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यालयात संपन्न झाला. यावेळी सोलापूरमधील विविध माध्यमांमध्ये कार्यरत पत्रकार बांधव, कुलकर्णी कुटुंबीय तसेच मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात उपस्थितांनी अविनाश व्यंकटेश कुलकर्णी यांच्या पत्रकारितेतील कार्याची आठवण काढत त्यांना अभिवादन केले. यावेळी सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे ,दत्तात्रय मेनकुदळे, प्रशांत बडवे, सांजचे अविनाश सी. कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!