---Advertisement---

शेतकऱ्यांच्या पदरी निराशा : देशातील कांद्याच्या दरात मोठी घसरण !

By team
On: July 17, 2025 3:51 PM
Follow Us:
---Advertisement---

छत्रपती संभाजीनगर: वृत्तसंस्था

निसर्गाचा लहरीपणा, सरकारच्या बेहिशेबी धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी नेहमीच अडचणीत येतो. त्यातच आगीत तेल ओतल्याप्रमाणे मागील तीन महिन्यांपासून बांगलादेशकडून होणाऱ्या आयातबंदीमुळे देशातील कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली. याचाच फटका जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. साठवलेला कांदा विकला तर तोटा, ठेवला तर सडण्याची शक्यता असल्याने इकडे आड तिकडे विहीर, अशी शेतकऱ्यांची परिस्थिती आहे.

कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. सध्या ठोक बाजारात कांदा ७०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटल दराने विकला जात आहे, तर किरकोळ बाज-ारात १० ते १५ रुपये प्रतिकिलो दराने विक्री होते. मात्र हा दर शेतकऱ्यांच्या अपेक्षेपेक्षा फारच कमी आहे. दरम्यान तज्ज्ञांच्या मतानुसार, कांद्याची निर्यात धोरणात शाश्वत आवश्वक आहे. नाही तर बेभाव ही समस्या कायम राहील. तसेच कांद्याचे दर सुधारण्यासाठी सरकारने उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्या केल्या नाहीत तर सरकार विरोधात जोरदार आवाज उठवणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांकडून देण्यात येत आहे.

66 सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीला, केंद्र सरकारचे शेतकरी हिताचे नसलेले निर्यात धोरण जबाबदार आहे. कांद्याचे दर वाढले की, ग्राहकांसाठी ते कमी करण्यासाठी सरकार अॅक्शन मोडवर येते. त्याचप्रमाणे कमी झाले की, शेतकऱ्यांसाठी सरकार गप्प बसते. त्यामुळे ग्राहकांच्या हिताप्रमाणे राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करावा आणि सरकार व विरोधी पक्षानेही जास्तीत जास्त कांदा निर्यातीसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!