---Advertisement---

मोठी बातमी : मुख्यमंत्र्यांच्या ऑफरनंतर उद्धव ठाकरेंनी घेतली पुन्हा भेट !

By team
On: July 17, 2025 4:26 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली आहे. सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनामध्ये ठाकरे गटाच्या आमदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास खात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील जोरदार प्रहार केला. त्यानंतर शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना सभागृहात देखील पाहायला मिळाला. या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी ही भेट घेतली असल्याचे मानले जात आहे.

विधान परिषदेमध्ये काल विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खेळीमेळीच्या वातावरणात उद्धव ठाकरे यांना सरकारमध्ये सामील होण्याची ऑफर दिली होती. या ऑफर नंतर आज शिवसेना विरुद्ध शिवसेना यांच्यात चांगलीच चकमक पाहायला मिळाली. या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची ही भेट घेतली असल्याचे मानले जात आहे.

विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या दालनामध्ये ही बैठक झाली. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. त्रिभाषा सुत्र, विरोधी पक्ष नेते पद यांच्यासह काही महत्त्वाच्या विषयांवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे हे देखील या बैठकीला हजर होते.

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज सत्ताधारी व विरोधकांत जोरदार खडाजंगी झाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते भास्कर जाधव यांनी आज नियम 293 अन्वये प्रस्ताव मांडला. पण ते भाषण करताना सत्ताधाऱ्यांनी वारंवार अडथळा आणला. त्यावर विरोधक चांगलेच संतप्त झाले. त्यांनी या प्रकारावर आक्षेप नोंदवत सभात्याग केला. त्यानंतर विधिमंडळ परिसरात पत्रकारांनी संवाद साधताना भास्कर जाधव यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नापसंती व्यक्त केली.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपल्यामुळे त्यांना काल निरोप देण्यात आला. त्यानिमित्ताने आयोजित समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना ‘उद्धवजी तुम्हाला इकडे यायचा ‘स्कोप’ आहे, अशी थेट ऑफर दिली होती. त्यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले होते. या पार्श्वभूमीवर देखील ठाकरे-फडणवीस यांच्या भेटीकडे पाहिले जात आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!