---Advertisement---

शहाणपणा करू नका, बोलता येत नसेल, तर बोलायचं नाही. कळलं का? रोहित पवारांचा पोलिसाला दम !

By team
On: July 18, 2025 4:44 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सध्या वादग्रस्त ठरत आहे. 17 जुलै रोजी विधानभवन परिसरात आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमधील हाणामारीने गंभीर स्वरूप धारण केले. या घटनेनंतर रात्री उशिरा पोलिसांनी आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना अटक केली, यामुळे वाद आणखी चिघळला.

या प्रकरणात आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचा आझाद मैदान पोलीस ठाण्यात एका पोलीस अधिकाऱ्याशी (PSI) झालेल्या बाचाबाचीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत रोहित पवार पोलिसांना “तू एक साधा PSI…” असे म्हणत आक्रमकपणे बोलताना दिसत आहेत. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

17 जुलै रोजी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी नितीन देशमुख यांना विधानभवन परिसरात अटक केली. ही माहिती समजताच जितेंद्र आव्हाड तातडीने विधानभवनात पोहोचले आणि कार्यकर्त्यांसह पोलिसांच्या गाडीसमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी त्यांनी पोलिसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी आव्हाड यांना खेचून गाडीला रस्ता मोकळा करून दिला. यानंतर, नितीन देशमुख यांना कोणत्या पोलीस ठाण्यात नेले आहे, याची माहिती घेण्यासाठी आव्हाड आणि रोहित पवार आझाद मैदान पोलीस ठाण्यात पोहोचले. मात्र, पोलिसांनी त्यांना योग्य माहिती न दिल्याने आणि एका PSI ने हातवारे करत बोलण्याचा प्रयत्न केल्याने रोहित पवार संतापले.

हात वर केला तर सांगतो तुम्हाला : रोहित पवार

व्हायरल व्हिडीओत पवार आक्रमकपणे PSI ला सुनावताना दिसत आहेत, “आवाज खाली!! आणि हात वर केला तर सांगतो तुम्हाला. शहाणपणा करू नका, बोलता येत नसेल, तर बोलायचं नाही. कळलं का? चला व्हा तिकडे. आमदाराला हात लावायचा नाही.” यावेळी पवार यांच्या बाजूच्या एका व्यक्तीने PSI ला “तू एक साधा PSI…” असे म्हणत अपमानास्पद भाषा वापरली, या वक्तव्याने हा वाद अधिक तीव्र झाल्याचे दिसत आहे. वरिष्ठ पोलिसांनी हस्तक्षेप करून हा वाद थांबवला, मात्र या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय आणि सामाजिक स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!