---Advertisement---

खळबळजनक : वाल्मीक कराड धनंजय मुंडेंच्या वाईटावर होता ; बांगरचा धक्कादायक खुलासा !

By team
On: July 25, 2025 4:51 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

बीड येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणात जेलची हवा खाणारा वाल्मीक कराड हा माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा राईट हँड मानला जातो. पण तोच त्यांच्या वाईटावर टपला होता. त्याला धनंजय मुंडे यांना संपवून परळीत पोटनिवडणूक घ्यायची होती, असा धक्कादायक दावा कराडचा जुना सहकारी बाळा बांगर यांनी केला आहे. बांगर यांच्या या आरोपामुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.

परळी येथील महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटी व सीआयडीमार्फत करण्यात यावा या मागणीसाठी आज कन्हेरवाडी व भोपाळा ग्रामस्थांकडून परळी – अंबाजोगाई मार्गावर रास्ता रोको करण्यात आला. या आंदोलनात महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आपल्या कुटुंबासह हजर राहिल्या. एवढेच नाही तर मस्साजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय मुंडे व बाळा बांगरही या आंदोलनात सहभागी झाले. यावेळी बोलताना बांगर यांनी उपरोक्त दावा केला.

माझा परळी पोलिसांवर फार विश्वास नाही. वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांच्या वाईटावर होता. मुंडे यांना संपवून वाल्मीक कराडला परळीत पोटनिवडणूक घ्यायची होती. एवढेच नाही तर धनंजय यांचे पीए प्रशांत जोशी यांना मारण्याचा कटही त्याने रचला होता. वाल्मीक कराडने माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनाही त्रास दिला. त्यामुळे आता ठोस आश्वासन मिळेपर्यंत मागे हटायचे नाही, असे बाळा बांगर यांनी म्हटले आहे.

ते पुढे म्हणाले, प्रस्तुत प्रकरणात तोंड न उघडण्यासाठी माझ्यावर दबाव होता. पण या प्रकरणात जबाब दिल्याचे त्यांना माहिती नव्हते. मी कुणालाही घाबरणार नाही. माघारही घेणार नाही. वाल्मीक कराडने परळीला कीड लावली. मी स्वतः फरार होतो. त्यामुळे मला बोलायला विलंब झाला. प्रशासनाने वाल्मीक कराड व त्याच्या गँगला अभय दिले. आता तो केव्हाच तुरुंगातून बाहेर येणार नाही.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!