---Advertisement---

तुमच्यामुळे सरकारची बदनामी होतेय ; अजित पवारांनी व्यक्त केली नाराजी !

By team
On: July 29, 2025 4:14 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई  : वृत्तसंस्था

राज्यातील महायुती सरकारमधील अजित पवार गटाचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्यांचा सपाटा आणि विधानपरिषदेत अधिवेशनकाळात ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने टीकेच्या भोवऱ्यात सापडलेले असून आता राजीनामा घेतला जाणार की नाही, याचा लवकरच फैसला होणार आहे. आज राज्यमंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यापूर्वी माणिकराव कोकाटे आपल्या मुलीसह मंत्रालयात आले होते. त्यांनी अजित पवार यांच्या अँटी चेंबरमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली. अँटी चेंबरमध्ये झालेल्या चर्चेवेळी अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांची खरडपट्टी काढल्याचे समजते.

अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांना स्पष्टपणे नाराजी बोलून दाखवली. कोकाटे तुमच्यामुळे सरकारची बदनामी होत आहे. बोलताना आपण भान ठेवायला हवे, असे अजित पवार यांनी कोकाटे यांना म्हटल्याचे समजते. यानंतर माणिकराव कोकाटे यांनी झाल्या प्रकाराबद्दल अजित पवार यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली. पुढील काळात अशा बाबी घडणार, असे आश्वासनही दिले. यानंतर थोडीफार जुजबी चर्चा होऊन अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांच्यातील बैठक संपली. या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांच्या दालनात जमले आहेत. आता थोड्याचवेळात अजित पवार हे माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबतचा निर्णय जाहीर करु शकतात. माणिकराव कोकाटे यांच्या सभागृहात ऑनलाईन रमी खेळणे आणि ‘शासन भिकारी आहे’ या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे अजितदादांवर कोकाटे यांचा राजीनामा घेण्यासाठी दबाव वाढला होता.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!