---Advertisement---

रोहित पवारांचा खळबळजनक दावा : मुंडेंच्या गळ्याचा मांसाचा तुकडा कापून कराडच्या टेबलवर !

By team
On: July 30, 2025 10:21 AM
Follow Us:
---Advertisement---

बीड : वृत्तसंस्था

राज्यातील बीड जिल्ह्यातील महादेव मुंडे हत्याकांडाने संपूर्ण राज्यात खळबळ उडवली आहे. या प्रकरणात आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी परळीत मुंडे कुटुंबीयांची भेट घेऊन धक्कादायक माहिती उघड केली आहे.

त्यांनी सांगितले की, 12 गुंठे जमिनीच्या वादातून महादेव मुंडे यांचा निर्घृण खून झाला. या जमिनीवर वाल्मिक कराड यांच्या मुलाची नजर होती. वाल्मिक कराड यांचे दोन मुले आणि गोट्या गित्ते यांनी मिळून महादेव मुंडेंना क्रूरपणे मारलं. पोस्टमार्टेम अहवालातून तर अधिक भयंकर माहिती समोर आली आहे. महादेव मुंडे यांच्या गळ्याजवळचा मांसाचा तुकडा कापून तो वाल्मिक कराड यांच्यासमोर टेबलवर ठेवण्यात आला, असा खळबळजनक दावा बाळा बांगर यांनी केला आहे.

रोहित पवार यांनी मुंडे कुटुंबीयांकडून संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी सवांद साधला. ते म्हणाले की, सतीश फड आणि ज्ञानेश्वरी मुंडे यांनी या हत्येचा घटनाक्रम सांगितला. सतीश फड यांनी आपल्या बहिणीला न्याय मिळावा यासाठी स्वत:च्या खिशातून दीड लाख रुपये खर्च करून सीडीआर डेटा काढला. या प्रकरणात पुरावे असूनही पोलिसांनी मुख्य आरोपींना अटक केलेली नाही, असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला. त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, परंतु FIR मध्ये इतर नावांचा समावेश नसल्याने त्यांचे समाधान झाले नाही.

रोहित पवार यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकात (SIT) संतोष साबळे यांचा समावेश करण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी आयजी उमाप यांच्याशी चर्चा केली असून, रश्मी शुक्ला यांच्याकडेही पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. मुंडे कुटुंबाला मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना भेटण्याची इच्छा आहे, परंतु त्यांना भेटण्यापासून रोखले जात असल्याचा आरोप पवार यांनी केला. त्यांनी तिन्ही बड्या नेत्यांना कुटुंबाचे म्हणणे ऐकून न्याय देण्याची विनंती केली. तसेच, सतीश फड आणि ज्ञानेश्वरी मुंडे यांना पोलिस संरक्षण देण्याची मागणीही केली.

पवार यांनी वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, कराड यांच्या परिचयातील काही लोक गांजा आणि ड्रग्सच्या रॅकेटमध्ये सामील आहेत. या लोकांमुळे मुंडे कुटुंबाला धोका आहे. त्यांनी वाल्मिक कराड यांची 1000 कोटींची संपत्ती जप्त करून त्याच्या मालमत्तेच्या चौकशीसाठी SIT नेमण्याची मागणी केली. “ही संपत्ती कुठून आली आणि यात कराड यांचे भागीदार कोण आहेत, हे जनतेसमोर यायला हवे,” असे पवार म्हणाले.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!