---Advertisement---

शिंदे गटाला सोलापुरात धक्का ; जिल्हा संपर्कप्रमुखांचा तडकाफडकी राजीनामा !

By team
On: July 31, 2025 3:41 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : वृत्तसंस्था

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला सोलापूर जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. जिल्ह्याचे संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला असून, त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्याकडे आपले राजीनामा पत्र सादर केले आहे.

या पत्रात सावंत यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त करत म्हटले आहे की, “सोलापूर जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांच्या निवडी माझ्याशी कोणतीही चर्चा न करता केल्या गेल्या. माझ्या माढा तालुक्यातील तालुकाध्यक्ष आणि शहरप्रमुख यांचीही निवड परस्पर करण्यात आली. या घडामोडीमुळे पक्षश्रेष्ठींना माझ्यावर विश्वास राहिलेला नाही, हे स्पष्ट होते. त्यामुळे मी राजीनामा देतो.”

गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटात सोलापूर जिल्ह्यातील अनेक नव्या चेहऱ्यांचा प्रवेश झाला आहे. माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे आणि शोभा बनशेट्टी यांचा समावेश त्यात आहे. या प्रवेशांमध्ये लोकसभा संपर्कप्रमुख महेश साठे आणि अनिता माळगे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेत सावंत यांचा सहभाग दिसून आला नाही. त्यामुळे अंतर्गत गटबाजी वाढल्याचे चित्र स्पष्ट झाले. आता शिवाजीराव सावंत यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या समर्थकांची पुढील भूमिका काय असते, याकडे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!