---Advertisement---

गुन्हेगारांची पुण्यातील पबमध्ये डीजे बर्थडे पार्टी !

By team
On: August 5, 2025 5:20 PM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

राज्यातील पुणे येथील पबच्या पार्किंगमध्ये झालेल्या बर्थडे सेलिब्रेशनची अनेक व्हिडीओ पुढे आली आहेत. या पार्टीमध्ये शंभरहून अधिक युवक सहभागी झाले होते. ही पार्टी विमानतळ पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार फिरोज शेख याने आयोजित केली होती. फिरोज शेखवर कलम 353 अंतर्गत गुन्हा नोंदवलेला आहे.

शनिवारी मध्यरात्री विमाननगरमधील दत्त मंदिर चौकातल्या “Three Musketeers” या पबच्या पार्किंगमध्ये काही कथित ‘भाई’ लोकांनी एकत्र येत बर्थडे पार्टी साजरी करत गोंधळ घातला. धक्कादायक म्हणजे या पार्टीत सहभागी झालेले जवळपास सर्वजण सराईत गुन्हेगार आहेत. या पार्टीचे आता व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे सर्व बर्थडे सेलिब्रेशन सुरू असताना अखेर पुणे पोलीस कुठे होते? असा प्रश्न उपस्थित केला जात असून परिसरात नागरिकांमध्ये भितीचे वातावरण बघायला मिळतंय.

या पार्टीमध्ये शंभरहून अधिक युवक सहभागी झाले होते. ही पार्टी विमानतळ पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार फिरोज शेख याने आयोजित केली होती. विशेष म्हणजे फिरोज शेखवर कलम 353 अंतर्गत (सरकारी कर्मचाऱ्याला अडथळा निर्माण करणे) गुन्हा नोंदवलेला आहे आणि ज्या चौकातील पबमध्ये ही पार्टी झाली, त्याच परिसरात त्याने याआधी पोलिसांशी हुज्जत घालून अरेरावी केली होती.

या पार्टीत नुकताच MCOCA कायद्यातील गुन्ह्यातून येरवडा कारागृहातून सुटून आलेला गुन्हेगार आकाश कंचिले देखील त्याच्या टोळीसमवेत उपस्थित होता. ही पार्टी त्याच टोळीचा म्होरक्या निखिल कांबळे याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आली होती. निखिल कांबळे हा येरवडा पोलीस ठाण्यात पोलिसांच्या कस्टडीतून पळून जाण्याचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातून काही दिवसांपूर्वीच तो येरवडा जेलमधून सुटून आला आहे.

या डीजे पार्टीमुळे विमाननगर परिसरात प्रचंड चर्चा सुरू असून सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आता पोलीस या प्रकरणात कारवाई करतील का? गुन्हा दाखल केला जाईल का? असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरच ही बर्थडे पार्टी करण्यात आली. बर्थडे करणाऱ्या भाईच्या पेनटरने सर्व व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केली आहेत. व्हिडिओच्या माध्यमातून दहशत पसरवण्याचे काम भाई कडून सुरू असल्याचे यावरून स्पष्ट दिसत आहे. आता पोलीस काही कारवाई करणार का? हे देखील पाहण्यासारखे ठरेल.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!