---Advertisement---

डॉ.पुरुषोत्तम राजीमवाले महाराज यांच्या मातोश्री मालादेवी राजीमवाले यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

By team
On: August 10, 2025 3:14 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, :  प्रतिनिधी

शिवपुरी आश्रम, अक्कलकोट येथील मालादेवी श्रीकांतजी महाराज राजीमवाले (वय ६५) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शिवपुरी येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात एक मुलगा,एक मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे.

 

 

मालादेवी या श्री स्वामी समर्थ महाराज स्थापित दिव्य गुरु परंपरा पीठ गुरुमंदिरचे पिठाधीष तसेच विश्व फाऊंडेशन, शिवपुरी, अक्कलकोटचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले यांच्या त्या मातोश्री होत.परमसद्गुरू श्री गजानन महाराज यांच्या त्या स्नुषा होत्या.त्यांच्या निधनाने संपूर्ण विश्वातील अग्निहोत्र परिवारामध्ये शोककळा पसरली आहे.संध्याकाळी ८ वाजण्याच्या सुमारास अग्निहोत्री अनुयायी आणि अक्कलकोटकरांच्या उपस्थिती अत्यंत शोकाकुल वातावरणात शिवपुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी,माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले,वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, अक्कलकोट संस्थानचे मालोजीराजे भोसले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे,माजी नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी,माजी उपनगराध्यक्ष महेश हिंडोळे यांच्यासह विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!