---Advertisement---

अजित पवारांचा मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न ; भाजप नेते शिंदे !

By team
On: August 18, 2025 10:10 AM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

राज्यातील महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच रोहित पवार यांना उद्देशून केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. ‘जर भावकीचा विचार केला नसता तर तू आमदार झाला नसतास,’ असे वक्तव्य अजित पवार यांनी केले होते. यावरून आता भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. अजित पवार आपल्याला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला.

दहीहंडीनिमित्त बारामती दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलताना राम शिंदे यांनी आपला संताप व्यक्त केला. “अजित पवार शिळ्या कढीला ऊत का आणत आहेत?” असा सवाल करत त्यांनी, “हे वक्तव्य करून ते सातत्याने मला ‘टॉर्चर’ करण्याचा प्रयत्न करत आहेत,” असे म्हटले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरही अजित पवार यांनी रोहित पवारांना उद्देशून असेच वक्तव्य केले होते, आणि आता पुन्हा त्याचीच कबुली देत आहेत. अजित पवार राहून राहून सांगत आहे मी मदत केली, तर मी कसे म्हणणार मदत नाही केली, असे देखील राम शिंदे म्हणाले. असेही शिंदे म्हणाले.

राम शिंदे पुढे म्हणाले, मी अधिक काही बोलणार नाही. मात्र मी या सगळ्याचा बळी ठरलो आहे. मी केवळ 622 मताच्या फरकाने पराभूत झालो आहे. अशा पद्धतीचे वक्तव्य वारंवार करुन अजित पवार मला टॉर्चर करत आहे. सातत्याने मला नाउमेद करण्याचा प्रयत्न करत आहे. महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी या संदर्भात चर्चा केली पाहिजे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!