---Advertisement---

दोन्ही विषय पोलिसांच्या अखत्यारीत त्यामुळे त्यावर ‘नो कमेंट’, निरपेक्ष चौकशी व्हावी – जयंत पाटील

On: January 14, 2021 2:25 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : दोन्ही विषयावर मी कमेंट करणार नाही कारण दोन्ही विषय पोलिसांकडे आहेत त्यामुळे आम्हाला पोलिसांवर दबाव आणायचा नाही. निरपेक्षपणे चौकशी व्हावी असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मांडले.

आज प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आले असता माध्यमांनी मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्या विषयावर त्यांच्याशी संवाद साधला असता ते बोलत होते.

मंत्री नवाब मलिक यांच्याबाबत जे चर्चिले जात आहे त्यामध्ये जावयाने केलेल्या घटनेला म्हणजे ती केली आहे की नाही हे चौकशीत कळेल परंतु सासर्‍यावर परिणाम होण्याची आवश्यकता नाही असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

सध्या दोन्ही विषयात राजीनाम्याची आवश्यकता नाही. तशी परिस्थिती नाही. त्या परिस्थितीचा योग्य तो आढावा योग्य त्या स्तरावर घेण्यात येईल. मंत्रीमंडळात फेरबदल होण्याची आवश्यकता नसल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!