---Advertisement---

सणासुदीपूर्वी सुकामेवा स्वस्त; सरकारच्या निर्णयामुळे बाजारात आनंदाचे वातावरण !

By team
On: August 23, 2025 10:07 AM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

सुकामेव्याच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य ग्राहकांना तो परवडणं कठीण झालं होतं. मात्र आता वस्तू आणि सेवा करप्रणाली (GST) मध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण बदलामुळे सुकामेवा सर्वसामान्यांच्या आवाक्यात येण्याची शक्यता आहे. राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटाने केंद्र सरकारच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर, सुकामेव्यावरील GST दर १२ टक्क्यांवरून थेट ५ टक्क्यांवर आणण्यात आले आहेत.

या निर्णयामुळे सुकामेव्याच्या दरात प्रतिशे ७ टक्क्यांनी घट होणार असून, प्रतिकिलो दरात साधारणतः २१ ते ८४ रुपयांची घट अपेक्षित आहे. यामुळे सणासुदीच्या काळात ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

अमेरिकेने काही आयात उत्पादनांवर टॅरिफ वाढवले होते. त्यामुळे भारतात अमेरिकेहून आयात होणाऱ्या सुकामेव्याच्या किमती वाढण्याची शक्यता होती. मात्र, केंद्र सरकारने यावर तात्काळ प्रत्युत्तर देत GST दरात कपात केली, ज्यामुळे अमेरिकी टॅरिफ वाढीचा परिणाम भारतीय बाजारपेठेवर जाणवणार नाही.

कोणत्या देशांतून येतो सुकामेवा?

बदाम: कॅलिफोर्निया (अमेरिका), ऑस्ट्रेलिया

मॉमेरोन बदाम: इराण

पिस्ता: इराण, इराक

खारा पिस्ता: इराण, अमेरिका, कॅलिफोर्निया

अक्रोड: अमेरिका, चीली

अंजीर: इराण, अफगाणिस्तान

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!