---Advertisement---

शंकर म्हेत्रे यांचा वाढदिवसानिमित्त देवस्थानच्यावतीने सत्कार

By team
On: August 26, 2025 9:30 AM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

शिवसेना (शिंदे गट) गटाचे नेते शंकर म्हेत्रे यांचा वाढदिवस यंदा विशेष पद्धतीने साजरा झाला. यानिमित्ताने अक्कलकोटमधील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्यावतीने अध्यक्ष महेश इंगळे यांच्या हस्ते शंकर म्हेत्रे यांचा सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी शंकर म्हेत्रे यांना श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, श्रीफळ व पुष्पगुच्छ अर्पण करून सत्कार करण्यात आला. प्रथमेश इंगळे यांनीही या सोहळ्यात सहभाग नोंदवला. मंदीर परिसरात झालेल्या या कार्यक्रमाला भाविकांची उपस्थिती होती.

सत्कारानंतर मनोगत व्यक्त करताना म्हेत्रे म्हणाले,अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ हे आमच्या कुटुंबियांचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्याच मुळस्थान असलेल्या या वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात माझ्या वाढदिवसानिमित्त झालेला हा सत्कार माझ्यासाठी अभिमानास्पद क्षण आहे. महेश इंगळे यांच्या हस्ते हा सन्मान मिळणे म्हणजे स्वामी समर्थांचे कृपाछत्र माझ्या पाठीशी असल्याची जाणीव आहे.

मंदिर समितीच्यावतीने सुरू असलेल्या अशा उपक्रमांमुळे भाविकांमध्ये समाधानाची भावना निर्माण होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पुढे बोलताना त्यांनी महेश इंगळे यांनी व्यक्त केलेल्या प्रेमपूर्वक शुभेच्छा स्वीकारून सर्वांचे आभार मानले.

यावेळी दुधनी बाजार समितीचे माजी सभापती प्रथमेश म्हेत्रे, बाबासाहेब पाटील, मैनोदिन कोरबू, अस्लम कोरबू, रामचंद्र समाणे, रामा गद्दी, दर्शन घाटगे, श्रीशैल गवंडी यांसह मान्यवर उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!