ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अवघ्या दोन दिवसांत ‘लालबागचा राजा’ला १ कोटींवर दान !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यभरात गणेशोत्सवाचा मोठा उत्साह सुरु असून प्रत्येक भाविक आपल्या श्रद्धास्थानी असलेल्या बाप्पांच्या दर्शनासाठी जात आहे. ‘मुंबईचा राजा’ अशी ओळख असलेल्या लालबागचा राजाच्या चरणी गणेशोत्सवाच्या पहिल्या दोन दिवसांतच भाविकांनी भरभरून दान केले आहे. मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बाप्पाच्या दानपेटीत अवघ्या दोन दिवसांत १ कोटी १९ लाखांहून अधिक रोख रक्कम जमा झाली आहे. यासोबतच सोन्या-चांदीचे दागिनेही मोठ्या प्रमाणात अर्पण करण्यात आले आहेत.

शुक्रवारी एकाच दिवसात ७३.१० लाख रुपयांचे विक्रमी दान जमा झाले. यामध्ये स्टेजसमोरील दानपेटीत ३८.१० लाख रुपये, तर दर्शनाच्या रांगेतील दानपेटीत ३५ लाख रुपये मिळाले. रोख रकमेव्यतिरिक्त भाविकांनी २२५.८०० ग्रॅम सोने आणि ७,६५९ ग्रॅम चांदीचे दागिनेही दान केले. यापूर्वी गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी मंडळाला ४६ लाख रुपयांचे दान मिळाले होते. त्यात स्टेजसमोरील पेटीतून २५.५० लाख रुपये आणि रांगेतील पेटीतून २०.५० लाख रुपये जमा झाले होते. पहिल्या दिवशीही १४४.०५० ग्रॅम सोने आणि ७,१५९ ग्रॅम चांदीचे दागिने अर्पण करण्यात आले होते. या दोन दिवसांतील एकूण दानाची बेरीज पाहता बाप्पाच्या चरणी १ कोटी १९ लाख रुपयांची रोख रक्कम, सुमारे ३६९.८५० ग्रॅम सोने आणि १४,८१८ ग्रॅम चांदी जमा झाली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!