---Advertisement---

पुढील २४ तासांसाठी १७ जिल्ह्याला अति मुसळधार पावसाचा इशारा

By team
On: September 1, 2025 3:46 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात गेल्या काही दिवसांपासून तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. पण पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील चार दिवस राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील २४ तासांसाठी १७ जिल्ह्याला अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्यात राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

पुढील २४ तासात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, छ. संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, नागपूर वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याशिवाय जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. IMD, NRSC या केंद्रीय संस्था सोबत सतत संपर्क साधून पुढील हवामानाच्या अंदाजाची माहिती घेऊन सर्व जिल्ह्यांना प्रसारित करण्यात येत आहे. प्रशासना तर्फे एनडीआरएफ  आणि एसडीआरएफ यांना आपत्कालीन परिस्थिती करिता सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

दि.१ रोजी यलो अलर्ट – रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, छ. संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, नागपूर वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर,

दि.२ रोजी यलो अलर्ट – रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट, नाशिक, नाशिक घाट, नंदुरबार, धुळे, जळगाव, छ. संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, नागपूर वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!