---Advertisement---

राज्यातील अनेक जिल्ह्याला ‘येलो अलर्ट’ जारी !

By team
On: September 2, 2025 6:30 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

महाराष्ट्रात आजपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीसाठी जोरदार पावसाचा ‘अलर्ट’ जारी केला आहे. याशिवाय, पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर पावसाचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात सध्या चक्रवाताची स्थिती सक्रिय आहे. पुढील 24 तासांत हे वारे वायव्य दिशेला सरकून, वायव्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा किनारपट्टीसह मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यापासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढलेला असून, सप्टेंबरच्या सुरुवातीलाही तो कायम राहणार आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, समुद्राच्या तळाशी मान्सूनच्या द्रोणीय परिस्थितीमुळे कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे, तर राजस्थानच्या मध्य भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यामुळे, 2 सप्टेंबरपासून बंगालच्या खाडीवरही एक नवीन कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता असून, याचा परिणाम म्हणून देशाच्या विविध भागांत जोरदार पाऊस पडेल.

येत्या सात दिवसांत गुजरातसह महाराष्ट्रातील कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. 2 आणि 2 सप्टेंबर रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. तर 3, 4 आणि 5 सप्टेंबर रोजी कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड तसेच पुणे सातारा कोल्हापूर घाटमाथ्यावर हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. विदर्भातील चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यालाही ऑरेंज अलर्ट आहे .मुंबई, ठाणे, पालघर ,नाशिक ,नगर ,पुणे, बीड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय .उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यातही तुफान पावसाची शक्यता आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!