---Advertisement---

धनंजय मुंडेंना मोठा दिलासा ; राजीनाम्याचं गंडांतर तूर्तास टळलं

On: January 15, 2021 10:11 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई: बलात्काराच्या आरोपांमुळं अडचणीत आलेले राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना तूर्त दिलासा मिळाला आहे. राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वाकडून तूर्तास धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात येणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

काय आहे प्रकरण?

धनंजय मुंडे यांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप करत रेणू शर्मा नामक महिलेनं मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या संदर्भातील पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाल्या होत्या. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियातूनच यावर खुलासा केला होता. रेणू शर्मा हिच्याशी आपला काहीएक संबंध नाही. तिची मोठी बहीण करुण शर्मा हिच्याशी परस्पर सहमतीनं मी संबंध ठेवले होते. तिच्यापासून मला दोन मुलं आहेत, अशी कबुलीही मुंडे यांनी दिली होती. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या होत्या. मात्र, गुरुवारी दुपारच्या सुमारास भाजप नेते कृष्णा हेगडे यांच्या खळबळजनक गौप्यस्फोटानंतर हे चित्र पूर्णपणे पालटले होते. रेणू शर्मा यांनी आपल्याला हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप हेगडे यांनी केला होता.

त्यानंतर रेणू शर्मा यांनी आणखी काही लोकांना अशाचप्रकारे ब्लॅकमेल केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या सगळ्याची माहिती घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पोलिसांच्या पुढील तपासापर्यंत थांबायचा निर्णय घेतला आहे. परिणामी तूर्तास धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागणार नाही. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावरील राजकीय गंडांतर टळल्याचे मानले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!