---Advertisement---

मावशीचा फोटो वापरून भाच्याने घेतले पैसे !

By team
On: September 3, 2025 10:14 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

बुलढाणा जिल्ह्यातील जानेफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिचरासह एका तरुणाने पत्नीच्या अर्जावर स्वत:चे आधार जोडून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आल्यानंतर मेहकर तालुक्यातीलच जवळा येथील एक बोगस लाभ घेतल्याचे प्रकरण बाहेर आले. मावशीच्या फोटोचा वापर करून स्वत:चे आधार जोडत वाशीम जिल्ह्यातील भाच्याने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे दीड हजार रुपये लाटल्याची गंभीर बाब पडताळणीत उघडकीस आली आहे.

‘त्या’ मावशीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत अर्ज भरण्यासाठी बहिणीच्या मुलाकडे अर्थात भाच्याकडे कागदपत्रे दिली होती. वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात येणाऱ्या मोपचा रहिवासी व ग्राहक सेवा केंद्रावर काम करणाऱ्या भाच्याने मावशीचा अर्ज भरला. नावासमोर तिचा फोटोही जोडला. परंतु अर्जाला स्वत:चे आधारकार्ड जोडले. यामुळे ‘लाडकी बहीण’ म्हणून त्याच्या नावाने रक्कम बँक खात्यात जमा होत गेली.

शासनाने पडताळणी सुरू केल्याने अनेक वेगवेगळे कारनामे समोर येऊ लागले आहेत. महिलांच्या योजनेत पुरुषांची घुसखोरी झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. पुढील काळात ‘त्या’ महिलेच्या लाभाची रक्कम बंद झाल्यानंतर तिनेही ओरड सुरू केली. भाच्याने मावशीसोबतच शासनाचीही फसवणूक केली आहे. दरम्यान, बुलढाणा जिल्हा परिषदेत 199 कंत्राटी तत्वावर कार्यरत महिलांच्या नावाची यादी प्राप्त झाली. त्यानुसार महिला व बालकल्याण विभागातर्फे पडताळणी सुरू झाली आहे. मावशीसोबतच भाच्याचीदेखील दीड हजार रुपये प्रतिमाह रक्कम बँक खात्यात प्राप्त झाली. त्याने 16 हजार 500 रुपयांचा लाभ उचलल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!