---Advertisement---

तळमळीने काम केल्यास स्वर्गीय समाधान मिळते ; प्राचार्य व्हनमाने

By team
On: September 3, 2025 4:17 PM
Follow Us:
---Advertisement---

श्रीक्षेत्र तीर्थ (ता.द.सोलापूर) : प्रतिनिधी

आपण स्विकारलेली कामे ही देवपूजा समजून तन ,मन, धन समर्पित करून केल्यास मिळणारे समाधान स्वर्गीय आनंदाचे असते. शिक्षकाला हे समाधान मुलाना प्रामाणिकपणे मार्गदर्शन केल्याने मिळते. शिक्षकांनी स्वतःला झोकून देऊन काम करावे असे आवाहन प्राचार्य सदाशिव व्हनमाने यानी श्री रामलिंगेश्वर प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय आयोजित गणेश व्याख्यानमालेत केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांकडून गणेश पूजन व आरती करण्यात आली.त्यानंतर मद्रे येथील मानवता विकास विद्यालयाचे मुख्याध्यापक रसूल शेख मार्गदर्शन करताना म्हणाले की,येथील वातावरण, झाडीने व्यापलेला परिसर विद्यार्थ्यांना निसर्ग प्रेम शिकवितो .विद्यार्थ्यांनी स्वत:ची गुणवत्ता सिध्द करुन आई, वडील, शिक्षक यांना अभिमान वाटेल असे श्रम करून यश मिळवावे.

अध्यक्षीय समारोप करताना प्रा.डॉ.भीमाशंकर बिराजदार म्हणाले की,विद्यार्थ्यांच्या यशाचे शिल्पकार हे शिक्षक असतात. प्राप्त परिस्थितीत यश मिळवून देणारे शिक्षक विद्यार्थ्यांच्या आयुष्यभर लक्षात राहतात. ही गोष्ट लक्षात ठेवून अध्यापन करावे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुधीर सोनकवडे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.सावित्री बिराजदार -पाटील यांनी केले.कार्यक्रमास शिवराज बिराजदार, श्रीशैल स्वामी,महेंद्रकर, नागराज पाटील,प्रा. शांतप्पा बगले,प्रा.अमर पाटील, शिल्पा महेंद्रकर, सिध्देश्वर बिराजदार, बाबासाहेब दोडमिसे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी उपस्थित होते.पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!