---Advertisement---

संजय राऊतांचा हल्लाबोल : मिस्टर पवार कुठे गेला तुमचा डिसिप्लिन? 

By team
On: September 5, 2025 2:09 PM
Follow Us:
---Advertisement---

जळगाव मिरर | ५ सप्टेंबर २०२५

राज्यातील महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिला पोलीस अधिकाऱ्याला फोनवरून झापल्यानंतर त्यावर आता विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. संबंधित महिला अधिकाऱ्याला अजित पवार यांनी फोनवरून तुमच्यावर अॅक्शन घेईन अशा शब्दांत थेट धमकीच दिली आहे. अजित पवार आणि संबंधित महिला अधिकाऱ्याच्या संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता याच मुद्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे.

राज्याचा उपमुख्यमंत्री असलेला माणूस आयपीएस अधिकाऱ्याला बेकायेदशीर कामांना पाठिंबा द्या म्हणून सांगतोय, मी सांगतोय ते बेकायदेशीर काम कर असे ते सांगताहेत. आणि हेच अजित पवार इतरांना कायदा शिकवात, मग तुम्ही काय करता? असा खडा सवाल राऊतांनी अजित पवारांना विचारला आहे. तुम्ही सगळे चोरांचे सरदार आहात अशी जहरी टाकाही राऊतांनी केली आहे. तुम्ही महाराष्ट्र राज्य हे चोरांचं राज्य केलं आहे, महाराष्ट्राच्या उत्तम प्रशासनाला तुम्ही भ्रष्टाचाराची कीड लावताय. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अर्धा महाराष्ट्र लुटला असा घणाघातही राऊतांनी केला आहे.

मिस्टर अजित पवार कुठे गेला तुमचा डिसिप्लिन? 

तसेच मी बेशिस्त खपवून घेणार नाही असं ते म्हणतात, मग आता काय झालं ? एका आयपीएस अधिकाऱ्याला तुम्ही दम देता, तेही तुमच्या पक्षातील चोरांना संरक्षण देण्यासाठी? मिस्टर अजित पवार कुठे गेला तुमचा डिसिप्लिन? असा खडा सवाल राऊतांनी अजित पवारांनी विचारला आहे.

नैतिकदृष्ट्या सरकारमध्ये राहण्याचा अधिकारच नाही

तसेच संजय राऊतांनी अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. डिसिप्लिन, शिस्त कोणासाठी मग? हे प्रकरण समोर आल्यावर अजित पवारांना नैतिकदृष्ट्या सरकारमध्ये राहण्याचा अधिकारच नाही. या आधी नैतिकतेच्या मुद्यावर अनेकांना राजीनामे द्यावे लागले आहेत, असं राऊत म्हणाले आहेत.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!