ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पुरस्काराने शिक्षकांची जबाबदारी वाढते

श्री. स्वामी समर्थ पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

शिक्षण क्षेत्रातील चांगुलपणा समाजासमोर आला की सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो आणि कामाची उमेद दुपटीने वाढीस लागते. पुरस्काराने जबाबदारीतही वाढ होत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ नेते मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी केले. ते श्री. स्वामी समर्थ प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिक्षक नेते अनिल कादे यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्रीशैल नरोळे, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष सुरेश पवार, शिक्षक नेते दयानंद कवडे, संतोष हुमनाबादकर, अन्वर मकानदार, राजन ढवण, विठ्ठल ताटे, चेअरमन सिद्धाराम अंबिगेर तसेच संचालक मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

सभेत मागील आर्थिक वर्षातील कामकाजाचा आढावा घेऊन संस्थेच्या प्रगतीविषयी माहिती देण्यात आली. आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या धोरणांवर व्यापक चर्चा झाली. या वेळी अक्कलकोट तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शाळा व शिक्षकांना कै. विजयकुमार कलशेट्टी आदर्श शाळा पुरस्कार आणि गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शिक्षक समितीचे नेते सिद्धाराम बिराजदार यांचा सेवापूर्ती सन्मान मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला.

शिक्षण व्यवस्थेसमोरील आव्हाने आणि संघटनेची भूमिका यावर शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष सुरेश पवार यांनी परखड मत व्यक्त केले. संस्थेचा व्याजदर एक
अंकी असून संस्था स्वभांडवलावर कर्जपुरवठा करते, विश्वासार्हता, पारदर्शकता आणि काटकसरीच्या कारभारामुळे अल्पावधीतच सभासदांचा विश्वास संपादन करण्यात संस्थेला यश आले असल्याचे अध्यक्ष अनिल कादे यांनी सांगितले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी संचालक श्रीशैलप्पा हडलगी, दयानंद चव्हाण,बसवराज गोरे, महेश हंचाटे, राजशेखर गोब्बूर, यल्लप्पा ईटेनवरु, कल्याणी गंगोंडा, लायप्पा सुडगाडे, श्रीमंत पुजारी, संगय्या वस्त्रद, श्रीकांत राठोड, माधव लहाने, शोभा कलशेट्टी, कन्याकुमारी पडवळ, सचिव संतोष दांगट आदींनी परिश्रम घेतले.

गुणवंत शिक्षक सन्मान प्राप्त शिक्षक: रावसाहेब भोसले (कुरनुर), शंकर इंगोले (पितापूर), निरंजन जाधव (पाटीलवस्ती चुंगी), शिवशंकर बिराजदार (सदलापूर), वर्धमान गायकवाड (बोरगाव दे.), सोनुताई कटकधोंड (चिक्केहळळी), दादाराव भोंग (साफळे), सुभाष बिराजदार (हालचिंचोळी), गीता शिवणगी (मैंदर्गी), अश्विनी हिटनळळी (मुगळी), खंडेराव साळुंके (समतानगर), बसवराज परतबादी (लोहरवस्ती करजगी), सुरेखा सुतार (केंगाव बु.), हुन्नूरसिद्ध कोळी (अंकलगे), रविराज खडाखडे (कुमठे), राजश्री सट्टे (गौडगाव बु.), राजेंद्र पवार (तोळणूर), शशिकला कलशेट्टी (हैद्रा), लक्ष्मण म्हेत्रे (सातनदुधनी), श्रीशैल मलगण (दुधनी), लक्ष्मीपुत्र लिंबीतोट (न.प. १), उमाकांत मोरे (न.प. २), परवीनबेगम शेख (बऱ्हाणपूर), निंगण्णा कोळी (मुंढेवाडी) व नागनाथ सोरेगाव (ग्रामसेवक).

आदर्श शाळा सन्मान प्राप्त शाळा: तळेवाड, किणी, मुंढेवाडी (कन्नड), दुधनी (उर्दू).

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!