---Advertisement---

मंत्री राणेंचे पुन्हा वादग्रस्त विधान : हा देश हिंदुंचा आहे. इकडे सर्वधर्म समभा….

By team
On: September 25, 2025 10:23 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील महायुती सरकारमधील भाजपचे मंत्री नितेश राणे हे नेहमी त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी अशाच प्रकारचं विधान केलं आहे. आमच्या देशामध्ये सर्वात आधी हिंदुंचे हित बघितलं जाईल आणि मग बाकीच्यांचं. हा देश हिंदुंचा आहे. इकडे सर्वधर्म समभाव नाही चालणार, असं वादग्रस्त विधान नितेश राणे यांनी केलं आहे. यामुळे आता त्यांनी केलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

आपलं हे हिंदू राष्ट्र आहे ना..इथे कोणाचं दुसऱ्याचं चालणार नाही. आपण आपल्या हिंदू राष्ट्रांमध्ये, आपण अतिशय शांततेत कोणालाही न दुखावता आम्ही जर आमचे सण साजरे करत असू तर कोणालाही हिरव्या मिरच्या लागण्याची गरज नाही, असंही नितेश राणे यावेळी बोलाताना म्हणाले. कुठे गेला इकडचा आमदार कुठे लपून बसला? जर आमचे सण आम्हाला साजरे करून दिले नाहीत, तर आम्हाला देखील मोहरमच्या वेळी विचार करावा लागेल, असा इशारा नितेश राणे यांनी दिला.

मंत्री नितेश राणे हे नेहमी हिंदूंच्या मुद्यावर आक्रमपणे बोलत असतात. मात्र, त्यांनी केलेल्या विधानामुळे मोठा वादही निर्माण होतो. माध्यमांशी बोलताना नितेश राणे म्हणाले, “मी नेहमीच म्हटले आहे की मुंबईचा डीएनए हा हिंदुत्वाचा डीएनए आहे. जर कोणी आपल्या सणांकडे किंवा आपल्या देवी-देवतांकडे चुकीच्या नजरेने पाहिले तर आपले हिंदुत्ववादी सरकार त्यांना सोडणार नाही.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!