मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यात माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे निधानाबद्दल मोठा दावा केला. ज्यावरून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतरही त्यांचा मृतदेह उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर ठेवला होता हे मला त्या डॉक्टरांनी सांगितलं, असा खळबळजनक दावा रामदास कदम यांनी केला.
यावरून आता ठाकरे गटाचे नेते आक्रमक झाल्याचे चित्र आहे. यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा गटनेते आमदार भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांची श्वावानासोबत तुलना करत जहरी टीका केली आहे.
काय म्हणाले भास्कर जाधव?
शिवसेना नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात बाळासाहेबांसदर्भात केलेल्या विधानाचा भास्कर जाधवांनी चांगलाच समाचार घेतला. आमदार भास्कर जाधव म्हणाले, “रामदास कदमला मी छमछमदास, बामदास म्हणतो. रामदास कदमच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. सावली बारमध्ये भXXXXX करून त्यांनी पैसे कमावले आहेत, तो बार बंद झाल्यामुळे त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. रामदास कदमासारखा मूर्ख माणूस संपूर्ण महाराष्ट्रात नाही. कुवत नसलेल्या माणसांकडून टीका सुरू आहे. कदमांसारख्या श्वानांना आपण किंमत देत नाही.”
यावेळी भास्कर जाधवांकडून रामदास कदमांचा उल्लेख ‘बारदास कदम’ असा उल्लेख केला. “एकीकडे आम्ही शिवसेनाप्रमुखांचे भक्त म्हणायचे आणि त्याच शिवसेनाप्रमुखांवर अश्लाघ्य शब्दांत टीका करायची, अशा प्रकारचे हे बारदास कदम, छमछमदास, भXXXXX करणाऱ्यांकडून अशा प्रकारचे उद्गार अपेक्षित असतात. ज्या शिवसेनेने रामदास कदमला 32 वर्षे लोकप्रतिनिधी केले, त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त होणार नाही, कारण हा कृतघ्न माणूस आहे.”