---Advertisement---

तुळजाभवानी यात्रेकरूंना प्रसाद वाटपाचा शुभारंभ : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या सेवाभावी उपक्रमाला मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By team
On: October 5, 2025 10:14 AM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट :प्रतिनिधी

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अमोलराजे भोसले मित्र मंडळ व परिवार अक्कलकोट यांच्यावतीने श्री तुळजा भवानी मातेच्या दर्शनास जाणार्‍या भाविकांना प्रसाद वाटपाचा शुभारंभ आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी वळसंग टोल नाका येथे करण्यात आले.

याप्रसंगी माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, शिवसेना जिल्हा प्रमुख अमोलबापू शिंदे, मिलन कल्याणशेट्टी, शैलेस पिसे, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, न्यासाचे सचिव शामराव मोरे, अविनाश मडिखांबे, वळसंग सरपंच जगदीश आंटद, प्रथमेश इंगळे, श्रीशैल दुधगी, वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगले, संजय गायकवाड, महादेव होटकर, शफिक पटेल, अल्ताफ पटेल, सिद्धाराम कोडले, मलकप्पा कोडले, विजयकुमार देशपांडे, नाना भोसले, महेश कुलकर्णी, महेंद्र बंडगर, यासीन कटरे, शन्मुख स्वामी, अनिल बर्वे, सिद्धारुढ काळे, श्रीशैल भूसुनगी, हुसेनी कुरेशी, दिनेश नाडगोंडा, वीरेश बागलकोटी, विनायक सुरपुरे, धर्मराज गुंजले, शिलामनी बनसोडे, दाऊद आमलीचुंगे, सिद्धेश्वर तिपरादी, शांतकुमार गायकवाड, नागप्पा स्वामी आदींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

चौकट – श्री भगवान शंकराचे अक्षय पात्र- आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी आपल्या मनोगतातून श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्य संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ३८ वर्षापासून तर श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी श्रीक्षेत्र तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांसाठी गेल्या २४ वर्षापासून अविरत अन्नदान सेवा हे कार्य उल्लेखनीय असून, श्रीक्षेत्र अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांचे महात्म्य आहेच, तर अन्नछत्र हे श्री भगवान शंकराचे अक्षय पात्र असल्याचे यावेळी सांगून, कार्याचा गौरव केला.

याप्रसंगी माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, शिवसेना जिल्हा प्रमुख अमोलबापू शिंदे यांनी आपल्या मनोगतातून श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या कार्याचा गौरव करीत अन्नछत्राच्या जडणघडणीत संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्यासह विश्वस्त मंडळ, क्रियाशील सदस्य, सेवेकरी व कार्यकर्ते यांचे मोलाचे योगदानाबद्दल कौतुक केले.

याप्रसंगी मनोज निकम, बाळासाहेब घाटगे, रोहित खोबरे, पिटू सोनटक्के, निखिल पाटील, राजाभाऊ नवले, संजय गोंडाळ, शितल जाधव, प्रविण घाटगे, सागर गोंडाळ, रोहन शिर्के, बाळासाहेब पोळ, सुमित घाटगे, बाबुशा महिंद्रकर, कल्याणी छकडे, सिद्धेश्वर मोरे, सौरभ मोरे, पुरोहित सोमकांत कुलकर्णी, भारत पाटील, गोटू माने, आप्पा हंचाटे, केदार माळशेट्टी, शिव कापसे, संदीप सुरवसे, प्रवीण देशमुख, आकाश गडकरी, गोविंद शिंदे, तुषार सुरवसे, दर्शन घाटगे, सुराज्य घाटगे, सुराज्य भोसले, मुन्ना कोल्हे, ज्ञानेश्वर भोसले, स्वामीनाथ बाबर, नामा भोसले, राहुल इंडे, राजु पवार, रमेश हेगडे, दत्ता माने, प्रसाद हुल्ले, प्रसाद पाटील, वैभव मोरे, आतिष पवार, विराज माणिकशेट्टी, दिनेश हळगोदे, श्रीशैल कुंभार, धानप्पा उमदी, पिंटू हळळूरे, रोहित कदम, महांतेश स्वामी, समर्थ चव्हाण, बिरप्प्पा व्हनझेंडे, विश्वनाथ मोटगी, बलभीम पवार, किरण साठे, सिद्धाराम कल्याणी, शावरेप्पा माणकोजी, शिवकुमार स्वामी, सिध्देश्वर माळी, राजू म्हेत्रे, विनायक भोसले, मुन्ना महाडिक, समर्थ शिंदे, यश विभूते, शिवा मंगरुळे, वासू कडबगावकर, ज्ञानेश्वर पुजारी, समर्थ घाटगे, सागर जाधव, पप्पू कोल्हे, शुभम सावंत, प्रदीप बनजगोळ, संभाजीराव लोंढे, सागर याळवार, सुमित कल्याणी, रोहित मोरे यांच्यासह न्यासाचे सेवेकरी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रा.शिवशरण अचलेर यांनी केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!