---Advertisement---

जयपूर-अजमेर महामार्गावर भीषण अपघात : २ तासांत २०० सिलिंडरचा स्फोट !

By team
On: October 8, 2025 10:22 AM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

जयपूर-अजमेर महामार्गावर मंगळवारी रात्री १० वाजता एका रासायनिक टँकरची एलपीजी गॅस सिलिंडरने भरलेल्या ट्रकशी टक्कर झाली. यामुळे टँकरच्या केबिनमध्ये आग लागली. आग सिलिंडरपर्यंत पोहोचताच त्यांचा स्फोट झाला. एकामागून एक २०० सिलिंडरचा स्फोट झाला. काही ५०० मीटर अंतरावर शेतात पडले. १० किलोमीटर अंतरापर्यंत स्फोटांचे आवाज ऐकू आले. सुमारे दोन तास सिलिंडरचा स्फोट होत राहिला.

या अपघातात एक व्यक्ती जिवंत जळाली. १२ अग्निशमन दलाच्या गाड्यांनी तीन तासांनंतर आग आटोक्यात आणली. ट्रकमध्ये अंदाजे ३३० सिलेंडर होते. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, “आरटीओ गाडी पाहून टँकर चालकाने गाडी ढाब्याकडे वळवली. यादरम्यान, ती गॅस सिलेंडरने भरलेल्या ट्रकला धडकली.”

जयपूरमधील डुडू येथील मोखमपुराजवळ हा अपघात झाला. पाच पार्क केलेल्या वाहनांनाही आग लागली. या घटनेनंतर महामार्गाच्या दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली. बुधवारी पहाटे ४:३० च्या सुमारास महामार्ग पुन्हा सुरू करण्यात आला. महामार्गावरील सावर्डा कल्व्हर्टजवळील एका ढाब्यावर गॅस सिलिंडरने भरलेला एक ट्रक उभा होता. रसायने वाहून नेणारा एक भरधाव वेगाने येणारा टँकर त्याच्याशी धडकला. यामुळे दोन्ही वाहनांना आग लागली. काही वेळातच सिलिंडरचा स्फोट होऊ लागला. सुमारे दोन तास अधूनमधून सिलिंडरचा स्फोट होत राहिला.

ट्रक चालक शाहरुख म्हणाला, “या अपघातात माझा ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला.” आरटीओ वाहन पाहून केमिकल टँकर चालकाने स्वतःला वाचवण्यासाठी टँकर एका ढाब्यात धडकवला. यामुळे टँकर सिलिंडर भरलेल्या ट्रकला धडकला. यामुळे आग लागली. केमिकल ट्रक चालकाने स्वतःला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु आग अचानक पसरली. त्याचा जागीच मृत्यू झाला. अजमेर ते जयपूरमार्गे किशनगढ या मार्गावरील ताण कमी करण्यासाठी पोलिसांनी वाहतूक वळवली. किशनगढमधील वाहने रूपनगढ मार्गे जयपूरला पाठवण्यात आली. दरम्यान, जयपूरहून अजमेरकडे जाणारी वाहने २०० फूट बायपास मार्गे टोंक रोडकडे वळवण्यात आली.

 

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!