---Advertisement---

‘शिवतीर्थ’वर ठाकरे बंधूनी साजरी भाऊबीज !

By team
On: October 23, 2025 3:13 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

दिवाळीचा उत्साह सुरु असताना आज देशभरात भाऊबीज सण साजरा होत आहे. हा सण भावाबहिणीच्या प्रेम आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा उत्सव आहे. त्याच पार्श्वभूमीवर ठाकरे कुटुंबातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे आज शिवतीर्थ येथे बहीण उर्वशी ठाकरेसोबत भाऊबीज साजरी करणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही त्यांची बहीण जयजयवंती यांच्या घरी भाऊबीज साजरी करण्यासाठी दाखल झाले आहेत.

उद्धव ठाकरे बुधवारी राज ठाकरे यांचे निवासस्थान शिवतीर्थ येथे गेले होते. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या मातोश्री मधुवंती ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भेट घेत शुभेच्छा दिल्या. अलीकडच्या काही दिवसांत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटी वारंवार होत असल्याने, या संबंधांवर राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा सुरू आहेत.

आज पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र दिसणार आहेत. आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि अमित ठाकरे यांना उर्वशी ठाकरे ही एकमेव बहीण आहे. मागील काही महिन्यांपासून ठाकरे कुटुंबीयांची जवळीक वाढल्यामुळे यंदाची भाऊबीज ही शिवतीर्थावर साजरी होणार असल्याची माहिती मिळत आहे. ही ठाकरे कुटुंबाची भाऊबीज शिवतीर्थावर मोठ्या उत्साहात साजरी होणार असून, सर्वांचे लक्ष या विशेष भेटीकडे लागले आहे. तसेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे जयजयवंती ठाकरे-देशपांडे यांच्या घरी दुपारी दाखल झाले असून, तिथे दोन्ही ठाकरे बंधू बहीण जयजयवंती यांच्यासोबत भाऊबीज साजरी करणार आहेत.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या गेल्या काही महिन्यांत झालेल्या भेटींची संख्या आता आठवर पोहोचली आहे. या भेटी कौटुंबिक स्नेहबंधांमुळे होत असल्या तरी, प्रत्येक भेटीनंतर राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा रंगते. दोन्ही ठाकरे बंधूंनी अद्याप राजकीय युतीची कोणतीही औपचारिक घोषणा केलेली नसली, तरी त्यांच्या सलग भेटींमुळे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये ‘ठाकरे पुन्हा एकत्र येणार का?’ या चर्चेने जोर धरला आहे. त्यामुळे, भाऊबीजेच्या निमित्ताने ही त्यांची नववी भेट होते का आणि या भेटीतून काही नवे राजकीय संकेत मिळतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!