---Advertisement---

भरधाव बसला भीषण आग : १२ जणांचा गेला जीव ; ४० प्रवाशी करत होते प्रवास !

By team
On: October 24, 2025 9:42 AM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

गेल्या काही वर्षासापून महामार्गावरील बसमुळे अनेकांचा जीव गेल्याच्या घटना घडत असताना आता दिवाळीचा उत्साह सुरु असताना आंध्र प्रदेशातील कुरनूल येथील चिन्नाटेकुरजवळ एका खाजगी बसला आग लागली. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात १२ प्रवासी जिवंत जळाले. ही घटना शुक्रवारी पहाटे ३:३० च्या सुमारास घडली.

एनएच-४४ वर बस एका दुचाकीला धडकली. दुचाकी बसखाली गेली आणि इंधन टाकीला धडकली, ज्यामुळे बसला लगेच आग लागली. बस हैदराबादहून बेंगळुरूला जात होती. बसमध्ये अंदाजे ४० प्रवासी होते, त्यापैकी बरेच जण भाजले. १९ जणांनी उडी मारून बचाव केला. आपत्कालीन गेट तोडून बचावलेले लोक गंभीर भाजले आणि त्यांना कुरनूल सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पीटीआय या वृत्तसंस्थेने मृतांचा आकडा १२ असल्याचे सांगितले आहे, तर इतर रिपोर्ट्समध्ये २५ असल्याचे सांगितले आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की अनेक मृतदेह पूर्णपणे जळाले आहेत, ज्यामुळे त्यांची ओळख पटवणे कठीण झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!