---Advertisement---

दर्गहळळी येथे एकरुखच्या पाण्याचे आमदार कल्याणशेट्टी यांच्या हस्ते पूजन

On: September 27, 2020 12:31 PM
Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट, दि.२७ : एकरुख उपसा सिंचन योजनेतील दक्षिण आणि अक्कलकोट तालुक्यातील लाभ क्षेत्रात येणाऱ्या टप्पा क्रमांक 2 म्हणजेच अंतिम टप्प्याच्या पंपगृहाची यशस्वी चाचणी आज करण्यात आली.या पाण्याचे पूजन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते पार पडले.

24 वर्ष आतुरतेने प्रत्येक निवडणुकीत पाणी येण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न आज पूर्ण होत असल्याचे आमदार कल्याणशेट्टी यांनी यावेळी सांगितले.

आमदार कल्याणशेट्टी यांच्या पाठपुराव्याने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रमाला मंजुरी दिल्याने आज हा प्रकल्प पूर्ण होताना दिसत आहे,असे यावेळी सांगण्यात आले.या पार्श्वभूमीवर आज आमदार कल्याणशेट्टी यांच्या हस्ते दर्गनहळ्ळी येथे आलेल्या पाण्याचे पूजन पार पडले.यावेळी जलसंपदा विभागाचे माजी सचिव सी. ए.बिराजदार यांच्यासह या भागातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!