ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शांत,संयमी, मितभाषी स्वभावामुळे मिलन कल्याणशेट्टी यांची लोकप्रियता

वाढदिवसानिमित्त विविध संस्था, मान्यवरांतर्फे सत्कार

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

अक्कलकोटचे माजी नगरसेवक तथा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे बंधू मिलन कल्याणशेट्टी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. चौका – चौकात वाढदिवसाचे बॅनर झळकले होते. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

यावेळी बोलताना मान्यवरांनी मिलन कल्याणशेट्टी यांचा सर्वात मोठा गुण म्हणजे संवादकौशल्य आणि माणुसकीची भावना. कोणत्याही पक्षातील, जातीधर्मातील किंवा विचारसरणीतील व्यक्ती असो ते सगळ्यांशी समान वागतात. शांत, संयमी आणि नेहमी मदतीसाठी तत्पर असा त्यांचा स्वभाव लोकांच्या मनात आपलेपण निर्माण करतो, अशा भावना व्यक्त करत शुभेच्छा व्यक्त केल्या. अक्कलकोट भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात लोकमान्य मित्र परिवार यांच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटून दिवसभर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.यात मल्लिकार्जुन मंदिर पंच कमिटी,कोष्टी समाज, व्यापारी महासंघ, छत्रपती श्री संभाजी महाराज सोहळा समिती, शिव बंसव प्रतिष्ठान,सोन्या मारुती प्रतिष्ठान,साई समर्थ प्रतिष्ठान, श्री शक्तीदेवी नवरात्र महोत्सव, नागनाथ नवरात्र महोत्सव, राजे प्रतिष्ठान,पत्रकार संघटना,
रिद्धी सिद्धी गणेश मदिर समिती, भारत गल्ली नवरात्र महोत्सव आदी मंडळाचा सहभाग होता.

आमदार कल्याणशेट्टी यांच्या घरी भाजप नेते  आमदार प्रवीण दरेकर, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मिलन कल्याणशेट्टी यांचा सत्कार केला.स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्यावतीने अमोलराजे भोसले यांनी सत्कार केला.अक्कलकोट शहरातील प्रभाग क्रमांक १० मध्ये कल्याणशेट्टी यांच्या पुढाकाराने स्वच्छ भारत अभियानांतर्गत अनेक कामे झाली आहेत. नागरिकांना शौचालय बांधकामासाठी अनुदान अपुरे पडल्यास त्यांनी स्वतः आर्थिक मदत केली. प्रभागात एलईडी लाइट्स बसवून प्रकाशयोजना सुधारली, नव्या बसस्थानकाच्या कामावर वेळोवेळी भेट देऊन ते नियोजनबद्धपणे पूर्णतेकडे नेले. श्री मल्लिकार्जुन मंदिराच्या नव्या बांधकामात सहभाग घेऊन भविष्यातील पर्यटनवृद्धीला त्यांनी चालना दिली.सांस्कृतिक परंपरेचे संवर्धन हा त्यांचा आणखी एक जिव्हाळ्याचा विषय आहे. लोकमान्य गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून ते दरवर्षी आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर आणि सामाजिक उपक्रम राबवतात. तसेच लेझीम पथकांच्या माध्यमातून पारंपारिक संगीत आणि क्रीडा संस्कृतीचा वारसा जपण्याचे त्यांनी कार्य केले आहे.मानवतेचा खरा अर्थ दाखवणारे मिलनदादा हे संकटाच्या काळात धावून जाणारे कार्यकर्ते आहेत. अतिवृष्टीच्या काळात त्यांनी स्वतः जीव धोक्यात घालून अनेकांचे प्राण वाचवले, अपघातग्रस्त आणि रुग्णांना वेळेवर मदत केली. कोरोना काळात विवेकानंद परिवाराच्या माध्यमातून त्यांनी गरजू नागरिकांना अन्नदान आणि सेवकांना जेवणाचे डबे देण्याची जबाबदारी निभावली,अशा शब्दात कार्यकर्त्यांनी कौतुक करत वाढदिवसाचा आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी सागर कल्याणशेट्टी,अभय खोबरे, मल्लिनाथ साखरे, शिवशरण जोजन, आनंद तानवडे,प्रदीप पाटील,शिवू वाले,प्रवीण शहा, मल्लिनाथ आळगी,नन्नूभाई कोरबू, महेश हिंडोळे, उत्तम गायकवाड, अविनाश मडिखांबे, दत्तकुमार साखरे,नविद डांगे, सुनील सिद्धे, आप्पासाहेब बिराजदार, सुनील गोरे, विलास कोरे, गजानन पाटील,राजशेखर हिप्परगी,प्रथेमश जोजन, प्रशांत लोकापुरे,केदार माळशेट्टी,अतिष पवार, देविदास कवटगी,रोहिदास राठोड, संतोष जमगे,लखन झंपले,संतोष पराणे,दयानंद बाराचारी, अण्णाराव बाराचारी,सिद्धाराम टाके,निखिल बिराजदार,
शिवराज स्वामी ,अशोक जाधव,अंकुश चौगुले, धर्मराज गुंजले, बंटी राठोड, दया रोडगे,बालाजी पाटील,राहुल काळे, दयानंद बिडवे,प्रशांत शिंपी, शिवशंकर स्वामी, राजूभाऊ नवले, प्रवीण घाटगे, गोटू माने, निखिल पाटील, बंडू पाटील, सागर शिंदे, हन्नालाल मुल्ला, नागेश होटकर, कांतु धनशेट्टी, बसवराज शेळके, परमेश्वर यादवाड, अरविंद ममनाबाद, महेश पाटील, बाळा मडीखांबे, शैलेश राठोड, मुन्ना राठोड, प्रकाश टाके, मल्लिनाथ मसुती ,गुरुपादप्पा आळगी, प्रभाकर मजगे ,दत्तात्रय मुनाळे, उदय नरेगल, गिरमल गंगोडा,अनिल करजगी, खंडप्पा करकी, संजय जमादार,निशांत निंबाळकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!