ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मिलन कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त नन्नूभाई कोरबू मित्र परिवारातर्फे सत्कार

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट नगर परिषदेचे माजी नगरसेवक तथा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे बंधू मिलन कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष नन्नूभाई कोरबू मित्र परिवारातर्फे भव्य सत्कार करण्यात आला. त्यावेळी मुस्लिम बांधवांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता . अक्कलकोट भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी बोलताना नन्नूभाई कोरबू, म्हणाले मिलन कल्याणशेट्टी हे शहरातील युवा तरुण तडफदार नेतृत्व आहे.त्यांचा सर्वात मोठा गुण म्हणजे संवादकौशल्य आणि माणुसकीची भावना. कोणत्याही पक्षातील, जातीधर्मातील किंवा विचारसरणीतील व्यक्ती असो ते सगळ्यांशी समान वागतात. शांत, संयमी आणि नेहमी मदतीसाठी तत्पर असा त्यांचा स्वभाव लोकांच्या मनात आपलेपण निर्माण करतो, अशा भावना व्यक्त करत शुभेच्छा व्यक्त केल्या.

यावेळी वाहिद नाईकवाडी, सलीम शेख,शकील नाईकवाडी, अविनाश मडीखांबे, भैय्या नाईकवाडी, हुसेनसाहेब मुजावर,नवीद डांगे, इरफान कोरबू,रशीद खिस्तके,हनीफ कोरबू, अश्पाक शेख, सोनूबाबा नाईकवाडी, अझहर शेख,सुभान नाईक, कबीर नाईकवाडी, अफसर पठाण, जाहिद मुजावर, बबलू जमादार,सुरेश गायकवाड, असिफ नाईकवाडी, नबीलाल नाईकवाडी, सोनू इनामदार, संजय बडवे, साहिलगौडा बागवान,  सैपनराणा शेख आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!