अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
मुख्यमंत्र्यांचे विश्वास आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी मुस्लिम समाज बांधवांच्यावतीने भाजपा अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष नन्नूभाई कोरबू मित्र परिवारातर्फे भव्य सत्कार करण्यात आला.यावेळी मुस्लिम बांधवांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.हन्नूर रोडवरील कल्याणशेट्टी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये
या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना नन्नूभाई कोरबू म्हणाले, अक्कलकोटच्या वाढत्या गरजांचा वेध घेत आमदार सचिन कल्याणशेट्टी पुढील दशक लक्षात घेऊन शहर आणि तालुक्याच्या सर्वसमावेशक विकासाची मांडणी केली आहे. पर्यटन सुविधा, रस्त्यांचे आधुनिकीकरण, स्वच्छतेची शाश्वत रचना, युवकांसाठी कौशल्य विकास केंद्र, उद्योगांना प्रोत्साहन अशी अनेक नवीन उपक्रमांची पायाभरणी त्यांनी केली. राज्य आणि केंद्रातील नेतृत्वाशी सातत्याने संवाद साधून त्यांनी भविष्यातील प्रकल्पांसाठी आवश्यक तांत्रिक व आर्थिक मंजुऱ्या मिळवल्या असून याचा लाभ अक्कलकोटच्या सर्वच घटकांना होईल,अशा भावना व्यक्त करत शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी वाहिद नाईकवाडी, सलीम शेख, शकील नाईकवाडी,भैय्या नाईकवाडी, हुसेनसाहेब मुजावर,सरफराज विजापूरे,नवीद डांगे, इरफान कोरबू,रशीद खिस्तके,हनीफ कोरबू, अश्पाक शेख, सोनूबाबा नाईकवाडी, अझहर शेख,मुबारक शेख,सैपन हागलदिवटे, नूरद्दीन शेख,कबीर नाईकवाडी, अफसर पठाण, जाहिद मुजावर, बबलू जमादार, सुरेश गायकवाड, असिफ नाईकवाडी, नबीलाल नाईकवाडी, सोनू इनामदार, संजय बडवे, साहिलगौडा बागवान, सैपनराणा शेख आदी उपस्थित होते.