नागपूर : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्याची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. लोक पैसे घेऊन दुसऱ्यालाच मत देतात, असं वक्तव्य पटेलांनी केले. त्यांच्या या विधानानंतर विरोधकांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. यावर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रफुल पटेलांनी आजपर्यंत पैशाच्याचं भरोशावर राजकारण केलं आणि निवडणुका जिंकल्या आहेत. यापुढेही ते असंच करणार असल्याची टीका नाना पटोले यांनी केली.
“प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य खऱ्या अर्थानं हास्यास्पद आहे. प्रफुल्ल भाईंनी आतापर्यंत पैशांच्या भरोशावर राजकारण करत आले. आताही पैशाच्या भरोश्यावर राजकारण करणार आहेत. त्यामुळं प्रफुल्ल पटेल यांनी ज्या पद्धतीनं स्टेटमेंट केले आहे. त्या स्टेटमेंटला त्यांनी आत्मपरीक्षण करावं,” अशी टीका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केलि आहे. तर प्रफुल्ल पटेल यांच्या या वक्तव्याच्या सुप्रिया सुळेंनी समाचार घेतला. मतदारांची खिल्ली उडवण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनी केला.
नेमकं काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?
“निवडणुकीत जितकी गरजेची आहे, तितका पैसा खर्च करावाच लागतो. लोक पैसे घेऊन दुसऱ्याला मतदान करतात, फक्त पैशांच्या आधारावर कोणी जिंकू शकत नाही. समजनेवालो को इशारा काफी है,” असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी भंडाऱ्यात केलं आहे. तर महायुतीतील सहकारी सत्ताधाऱ्यांना इशारा देत त्यांनी म्हंटले की, “कोणीही स्वत:ला बाहुबली सजत असेल तर आम्ही अनेक बाहुबलींना निवडून दिलं असल्याचे प्रफुल्ल पटेल म्हणाले. दरम्यान, आता प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्यावरुन नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांचा रोख कोणाकडे आहे हे तुम्ही (मीडिया) शोधून काढा, असे फडणवीस म्हणाले.