ध्यास विश्वसार्ह बातमीचा

नामनिर्देशनातील मोठी चूक; उज्वला थिटेंचा अर्ज अपात्र : प्राजक्ता पाटील बिनविरोध नगराध्यक्षा !

सोलापूर : प्रतिनिधी

राज्याच्या राजकारणात सध्या सोलापुरातील अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीची जोरदार चर्चा रंगली असून अनगर नगरपंचायतीमध्ये नगराध्यपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार उज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाला आहे. त्यामुळे अनगर नगरपंचायतीमध्ये भाजपाचे नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. भाजपाकडून प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील यांची अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.

अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी तीन अर्ज दाखल झाले होते. यामध्ये भाजपकडून प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उज्वला थिटे आणि अपक्ष सरस्वती शिंदे यांनी अर्ज केला होता. काल अर्जाच्या छाननीत उज्वला थिटे यांनी नामनिर्देशन पत्रात सूचकाची सही केली नसल्याचा आक्षेप घेण्यात आला. यानंतर चौकशी केली असता उज्वला थिटे यांचा अर्ज अपात्र ठरवण्यात आल्याची माहिती अनगर नगरपंचायतचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी दिली. यानंतर डमी आणि अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी अर्ज मागे घेतला आणि प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील यांना अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवडण्यात आले.

राजन पाटील यांच्या धाकटी सून असून अजिंक्यराणा पाटील यांच्या पत्नी आहेत. तसेच अजित पवारांना आव्हान देणारे बाळराजे पाटील यांच्या प्राजक्ता पाटील भावजय आहेत. खूप आनंद मला झालेला आहे. सर्व ग्रामस्थांचे लोकांचे जे एवढं प्रेम करतात त्यांचे मनापासून आभार मानते. बिनविरोधचा आमचा वारसा कायम आहे, काही लोकांनी तो खंडित करण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही. गावात जो विकास झालंय त्यात भर घालण्याचा प्रयत्न असेल, असं प्राजक्ता पाटील म्हणाल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!