---Advertisement---

ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने दोन मुलांसह घेतली विहिरीत उडी : तिघांचा दुर्देवी मृत्यू !

By team
On: November 27, 2025 10:14 AM
Follow Us:
---Advertisement---

नाशिक : वृत्तसंस्था

नाशिकमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने दोन मुलांसह सामूहिक आत्महत्या केल्याची घटना समोर आली. नाशिकच्या चांदवड तालुक्यातील काजी सांगवी शिवारात ही घटना घडली. दिघवद येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने दोन मुलांसह विहिरीत उडी घेत आयुष्य संपवलं. या घटनेमुळे नाशिक हादरले आहे. घटनेची माहिती मिळताच चांदवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

नाशिकच्या चांदवड तालुक्यातील काजी सांगवी दिग्वद परिसरातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने आज टोकाचे पाऊल उचलले. या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने दोन मुलांसह आत्महत्या केली. सचिन हिरे असं या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे नाव होते. त्यांनी प्रज्ञा सचिन हिरे (१० वर्षे) आणि प्रज्वल सचिन हिरे (४ वर्षे) या दोन मुलांसह विहीरीत उडी घेत आत्मह्या केली. घराजवळील विहिरीत त्यांनी आयु्ष्याचा शेवट केला.

तिघांनी विहिरीत उडे घेत आत्महत्या केल्याची घटना कुटुंबाला समजताच खळबळ उडाली. तिघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यासाठी चांदवडच्या रायपूर येथील स्कुबा ड्रायवरला बोलवण्यात आले होते. विहिरीत प्रचंड पाणी आणि गाळ होता. त्यामुळे बऱ्याच तासांच्या अथक प्रयत्नानंतर तिघांचे मृतदेह विहिरीमधून बाहेर काढण्यात आले. हे मृतदेह चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात पोस्टमार्टम करण्यासाठी पाठवण्यात आले आहेत. सदर घटना ही कौटुंबीक वादातून झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. चांदवड पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!