ध्यास विश्वसार्ह बातमीचा

…तरी वृक्ष तोडणं अयोग्य आहे ; अण्णा हजारेंची महत्वाची भूमिका !

अहिल्यानगर : वृत्तसंस्था 

गेल्या काही दिवसापासून नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळा पूर्वीच मोठा वाद सुरु झाला आहे. नाशिकमधील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन परिसरातील हजारो झाडे साधुग्रामसाठी तोडली जाणार असल्याचा दावा पर्यावरण प्रेमी करत आहेत. वृक्षतोडीविरोधात वृक्षप्रेमी आणि राजकीय पक्षातील नेत्यांनीही आक्रमक भूमिका घेत विरोध केला आहे. अभिनेता सयाजी शिंदे यांनी देखील या प्रकरणी ठोस भूमिका मांडली आहे. या वादावर आता जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पहिली प्रतिक्रिया देत वृक्षतोडीला विरोध असल्याची भूमिका मांडली आहे.

अण्णा हजारे म्हणाले की, “कुंभमेळा जर समाज आणि राष्ट्र हितासाठी असला तरी वृक्ष तोडणं अयोग्य आहे. वृक्ष तोडल्यामुळे खूप नुकसान होतं, वृक्षांमुळे मनुष्यच नाही तर वन्य प्राण्यांना देखील जीवदान मिळते. वृक्ष तोडल्यामुळे राष्ट्राचं नुकसान होतं, प्राण्यांचं नुकसान होतं. मात्र, फारच आवश्यक असेल तर छोटी झाडे तोडावी, पण मोठी झाडे तोडू नयेत”, असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, तपोवनातील साधुग्रामच्या जागेवरील वृक्ष तोडीचा वाद दिवसेंदिवस चिघळू लागलेला आहे. ज्या ठिकाणी साधुग्राम उभारायचे आहे, त्या ठिकाणी पब्लिक प्रायव्हेट पार्टनर्शीप तत्ववार प्रदर्शन केंद्र, बॅक्वेंट हॉल, रेस्टॉरंट उभारण्याच्या घाट घातला जात आहे. या संदर्भात 220 कोटी रुपयांचे टेंडर महापालिका प्रशासनाने काढले असून 33 वर्षासाठी इथली जागा खाजगी विकासकाला दिली जाणार असल्याचा आरोप केला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!