सोलापूर : प्रतिनिधी
येथील म न पा मुलांची व मुलींची मराठी कॅम्प शाळा येथील विद्यार्थी वर्गाला कवायत संच भेट देण्यात आले. कै लक्ष्मण विठ्ठल पाटील सर यांच्या स्मरणार्थ सोलापूर महानगरपालिकांच्या विविध शाळामध्ये या उपक्रम साठी त्याच्या पंचकन्या मनीषा , उषा ,शिल्पा , स्वाती व आरती पाटील यांच्या माध्यमातून गेली २ वर्षे विद्यार्थी उपयुक्त विविध उपक्रम राबविले जात आहेत.
आतापर्यंत स्टडी टेबल , शैक्षणिक साहित्य तसेच विद्यार्थी वर्गाचे युनिफोर्म भेट म्हणून दिलेले आहे. कै लक्ष्मण पाटील यांच्या द्वितीय पुण्यतिथी निम्मित हा उपक्रम राबवीत असल्याचे त्यांची कन्या सौ स्वाती पाटील यांनी सांगितले.महानगरपालिका शाळामध्ये हुशार व गरजू विद्यार्थी वर्गासाठी अश्या विविध उपक्रमासाठी नेहमी प्रयत्नशील असल्याचे उपक्रमाचे समन्वयक प्रा विक्रमसिंह बायस यांनी आपल्या मनोगतात सांगितले. १५ हजार रुपयाच्या किमतीचे २ ढोल ,२ ड्रम ,२ खंजिरी , २ त्रिकोण , २ झांज तसेच २० लेझीम असे कवायत साहित्य या वेळी शाळेचे मुख्यध्यापक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. आपल्या मनोगतात बोलताना मुख्याध्यापक श्री सुरेश सरगम यांनी उपक्रमाचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे उद्द्येश मुख्यध्यापिका श्रीमती रेहाना नदाफ यांनी केले तर प्रास्ताविक श्री आप्पासाहेब काकमारे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री देवेंद्र दंतकाळे ,श्री राहुल नवले ,श्री धोंडू केंगळे ,श्री गंगा कांबळे ,श्रीमती गजाला शेख ,श्रीमती रंजना गायकवाड यांनी परिश्रम घेतले.