सोलापूर : सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहर अध्यक्ष प्रकाश वाले, सोमपा गटनेते चेतन नरोटे, नगरसेवक नरसिंग कोळी, विनोद भोसले, नगरसेविका फिरदौस पटेल, परवीन इनामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद सोलापूर कार्यायल गेट समोर देशाच्या संरक्षण विषयक गोपनीय माहिती उघड़ करणाऱ्या अर्णब गोस्वामी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुण ताबड़तोब अटक करावी या मागणीसाठी व संरक्षण विषयक गोपनीय माहिती उघड़ करणाऱ्या अर्णब गोस्वामी याच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन करुण निदर्शने करण्यात आली यावेळी अर्णब गोस्वामी विरोधात जोरजोरात घोषणाबाजीने जिल्हा परिषद परिसर दणाणुन गेला. तसेच यावेळी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांना निवेदन ही देण्यात आले.
यावेळी आमदार प्रणिती शिंदे म्हणाले की एका केंद्रीय मंत्र्यांबरोबर झालेला झालेला संवाद संरक्षण विषयक गोपनीय माहिती रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्नब गोस्वामी याने बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्याबरोबर व्हॉट्सअप चैट मधुन उघड़ केले या चैटमधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. विशेषतः पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. ही कारवाई होण्याच्या तीन दिवस आधी याची माहिती अर्नब गोस्वामीला कशी मिळाली? त्याने अजून कोणाला ही माहिती दिली का? तसेच त्याने स्वतः सांगितले आहे की ज्याने त्याला ही माहिती दिली तो मोदी सरकारमधील मोठा व्यक्ती आहे. त्यामुळे याची चौकशी होणे गरजेचे आहे.
पुढे बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाले अर्नब गोस्वामी यांचे कृत्य हे Official Secrets Act, 1923, Sec. 5 नुसार कार्यालयीन गोपनीयतेचा भंग करणारे तर आहेच पण हा देशद्रोहाचा प्रकार आहे. देशभक्तीच्या खोट्या गप्पा मारणाऱ्या अर्णब आणि भाजपा यांची हिच देशभक्ति आहे काय? भाजप देशद्रोही पार्टी असुन एकीकडे जवान शहीद होत असताना त्याचा वापर TRP वाढविण्यासाठी करणाऱ्या अर्णब गोस्वामी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुण ताबड़तोब अटक करावी त्याला अटक झाली नाही तर त्यांच्या पाठिमागे मोदी सरकार आहे हेच सिद्ध होते. अर्णब गोस्वामी ला ताबड़तोब अटक करावी या मागणीसाठी देशभरात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आंदोलन सुरु आहे.
यांची होती उपस्थिती
यावेळी महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, कार्याध्यक्ष अरुण शर्मा, युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, NSUI जिल्हा अध्यक्ष गणेश डोंगरे, प महाराष्ट्र सेवादल अध्यक्ष सुदीप चाकोते, माजी महापौर अलकाताई राठोड, नलिनीताई चंदेले, ब्लॉक अध्यक्ष संजय गायकवाड़, उदयशंकर चाकोते, फ्रंटल अध्यक्ष भारत जाधव, भीमाशंकर टेकाळे, पवन गायकवाड़, मणिकसिंग मैनावाले, केशव इंगळे, अंबादास गुत्तिकोंडा, अशोक कलशेट्टी, तिरुपती परकीपंडला, सुमन जाधव, हाजिमलंग नदाफ, अनिल मस्के, किसन मेकाले गुरुजी, हारुण शेख, जेम्स जंगम, शौकत पठाण, मनीष गडदे, योगेश मार्गम, युवराज जाधव, राहुल वर्धा, राहुल बोळकोटे, उपेंद्र ठाकर, अप्पासाहेब बगले, दिनेश म्हेत्रे, धनराज जाधव, सूर्यकांत शेरखाने, VD गायकवाड़, शोहेब कडेचुर, सोमनाथ व्हटकर, हरीश गायकवाड़, शाहु सलगर, नूर अहमद नालवार, श्रीकांत दासरी, संघमित्रा चौधरी, शोभा बोबे, मुमताज तांबोळी, मीना गायकवाड़, मोनिका सरकार, अनिता भालेराव, सुनील व्हटकर, पंडित गणेशकर, नागेश म्याकल, सहदेव ईप्पलपल्ली, अनिल हलकट्टी, मुस्कान शेख, सोपान थोरात, बसंती सालुंखे, देवेंद्र सैनसाखळे, राम सरवदे, रंजना इरकर, चंद्रकांत टिक्के, राहुल सरवदे, चंद्रकांत नाइक, सागर भिसे, संतोषी गुंडे, इम्तियाज बेलिफ़, नीता बनसोडे, अप्पु शेख, साजिद मकानदार, सुरेखा घाडगे, फिरोज पटेल, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.