---Advertisement---

भरमशेट्टी यांच्या स्मृतीदिनी हन्नुर येथे उद्या विविध कार्यक्रम

By team
On: January 5, 2026 1:47 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : स्वामी समर्थ कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कै. काशिनाथ भरमशेट्टी यांच्या नवव्या स्मृतीदिनानिमित्त हन्नुर येथे के.बी. प्रतिष्ठान आणि भरमशेट्टी परिवाराच्यावतीने विविध सामाजिक व आरोग्यविषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती या प्रतिष्ठानचे आधारस्तंभ विश्वनाथ भरमशेट्टी यांनी दिली.

मंगळवार, दि.६ जानेवारी रोजी हन्नुर येथील महादेव मंदिरात सकाळी १० वाजता महात्मा बसवेश्वर ब्लड बँक, सोलापूर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन आमदार राजू खरे यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे हे राहणार आहेत.

या कार्यक्रमास स्वामी समर्थ कारखान्याचे अध्यक्ष संजीवकुमार पाटील, दुधनीचे नूतन नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील, शिवसेनेचे नेते मनीष काळजे, अमर पाटील, महेश साठे, दिलीप सिद्धे, बाबासाहेब पाटील आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

यावेळी चपळगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील नेते व माजी उपसभापती सिद्धार्थ गायकवाड, पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे, अशपाक अगसापुरे, कुरनूरचे सरपंच व्यंकट मोरे, तुकाराम बिराजदार, राजू चव्हाण, सिद्धाराम भंडारकवठे, राजू चव्हाण, राजू पाटील, इरसंगप्पा गड्डे, बसवराज बाणेगाव आदींची उपस्थिती राहणार आहे.

या शिबिरामध्ये हृदयरोगतज्ञ, मधुमेह व फुफ्फुसरोगतज्ञ डॉ. निलेश येळापुरे, हृदयरोगतज्ञ डॉ. बसवराज सुतार तसेच स्त्रीरोगतज्ञ डॉ. नेहा येळापुरे – भरमशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत ईसीजी, रक्तातील कोलेस्ट्रॉल तपासणी तसेच
स्त्रीरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमांना परिसरातील ग्रामस्थांनी
मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष वैभव भरमशेट्टी, उपाध्यक्ष रमेश छत्रे, सचिव गौरीशंकर भरमशेट्टी, ॲड. विशाल भरमशेट्टी, राजकुमार भरमशेट्टी, तिपण्णा हेगडे, बसवणप्पा सुतार, मनोज भरमशेट्टी, मिलन भरमशेट्टी, शब्बीर मुल्ला, सचिन बिडवे, चंद्रकांत जंगले, नरेंद्र जंगले, निरंजन हेगडे, परशुराम बाळशंकर आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!