---Advertisement---

सोलापुरात भाजपचा झेंडा! देशमुख पुत्रांचा 11 हजार मतांनी दणदणीत विजय

By team
On: January 16, 2026 2:57 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : (प्रतिनिधी) राज्याचं लक्ष लागलेल्या सोलापूर महापालिकेच्या निकालांनी राजकीय चित्र स्पष्ट केलं असून, सोलापुरात भाजपने बहुमताचा आकडा गाठत मोठं यश मिळवलं आहे. विशेषतः प्रभाग क्रमांक 2 कडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. मनसेचे युवा नेते बाळासाहेब सरवदे यांच्या हत्येनंतर या प्रभागात काय निकाल लागणार, याबाबत प्रचंड उत्सुकता होती.

या प्रभागातून भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचे सुपुत्र किरण देशमुख रिंगणात होते. शिवसेनेचे गणेश कुलकर्णी यांच्याविरोधात थेट लढत देत किरण देशमुख यांनी तब्बल 11 हजार मतांनी दणदणीत विजय मिळवला. याच प्रभागातील भाजपच्या उमेदवार शालन शिंदे सध्या अटकेत असतानाही त्या सुमारे 4 हजार मतांनी विजयी झाल्याची माहिती आहे.

प्रभाग 2 मध्ये भाजपचे चारही उमेदवार विजयी ठरले असून, हत्येच्या घटनेचा निवडणुकीवर कोणताही भावनिक परिणाम झाल्याचं दिसून येत नाही. किरण देशमुख यांच्यासह कल्पना कारभारी, नारायण बनसोडे आणि शालन शिंदे यांनी विजय मिळवत भाजपचा गड अधिक मजबूत केला आहे.

प्रभाग 2 मधील उमेदवारी माघारीच्या वादातून मनसे नेते बाळासाहेब सरवदे यांची हत्या झाली होती. त्यामुळे हा प्रभाग अत्यंत संवेदनशील मानला जात होता. मात्र, निकालांनी भाजपचं वर्चस्व स्पष्ट केलं असून सोलापूर महापालिकेत भाजपने निर्णायक आघाडी घेत बहुमताचा टप्पा पार केल्याचं चित्र आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!