ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शिंदेंचा मोठा डाव; शिवसेनेचे सर्व विजयी नगरसेवक तीन दिवस हॉटेलमध्ये

मुंबई वृत्तसंस्था : मुंबई महानगरपालिकेत भाजपाचा महापाैर होण्याचे संकेत असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत महत्त्वाचा आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा ठरलेला निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) कडून निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

शिंदे गटाचे सर्व विजयी नगरसेवक पुढील तीन दिवस मुंबईतील बांद्रा येथील ताज लॅन्ड्स एंड हॉटेलमध्ये मुक्काम करणार आहेत. या काळात नगरसेवकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आहे.

नगरसेवकांची फोडाफोडी होऊ नये आणि कोणत्याही प्रकारचा राजकीय घोळ टाळता यावा, यासाठीच हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. या हॉटेलमध्ये नगरसेवकांसाठी कडक सुरक्षेची व्यवस्था करण्यात आली असून, बाहेरील संपर्कावरही विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.

शिंदे यांनी नगरसेवकांना एकत्र ठेवत सुरक्षेच्या छत्राखाली ठेवण्याचा घेतलेला हा निर्णय सध्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आणणारा ठरत आहे. आपल्या पक्षातील नगरसेवक सुरक्षित राहावेत आणि कोणतीही राजकीय उलथापालथ होऊ नये, यासाठी शिंदे विशेष काळजी घेत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!