---Advertisement---

राज्यस्तरीय प्रबोधन पुरस्काराने प्राचार्य सिद्धाराम पाटील सन्मानित !

By team
On: February 5, 2026 4:43 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

समाजप्रबोधन, शिक्षण व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्य करणारे मातोश्री लक्ष्मीबाई म्हेत्रे प्रशाला व गुरुशांतलिंगेश्वर कनिष्ठ महाविद्यालय, दुधनी येथील प्राचार्य सिद्धाराम पाटील यांना चोखोबा ते तुकोबा एक वारी समिती – २०२६ यांच्यावतीने राज्यस्तरीय प्रबोधन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

या उल्लेखनीय कार्याची दखल घेत संस्थेचे मार्गदर्शक दुधनी विरक्त मठाचे मठाधिपती म.नि.प्र. डॉ. शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांनी कौतुक केले आहे.प्राचार्य पाटील हे शिक्षक आणि प्राचार्य या दोन्ही भूमिकांमध्ये त्यांनी अनेकांना सकारात्मक, प्रेरणादायी व मार्गदर्शक विचार दिले असून, त्यांची वागणूक, प्रभावी संवादशैली, निर्णयक्षमता व नेतृत्वगुण अनुकरणीय असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.

या सर्व बाबींचा सखोल विचार करून माजी खासदार सुनील गायकवाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष शंकर म्हेत्रे,सचिव प्रथमेश म्हेत्रे, महादेव खेड,शरणगौडा पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!