---Advertisement---

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतीस मुंबईत भव्य शोकसभा; नाना पाटेकर भावुक !

By team
On: February 24, 2026 10:40 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था 

28 जानेवारी रोजी विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अकाली निधन झाल्याने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली होती. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी आजही पचवणं कठीण आहे. त्यांच्या स्मृतीसाठी मुंबईतील वरळी डोम येथे आज भव्य शोकसभेचे आयोजन करण्यात आले, ज्यात राजकीय नेते, दिग्गज उद्योगपती, कलाकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शोकसभेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना दिग्गज कलाकार नाना पाटेकर भावुक झाले. उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी सांगितले, “माझा आणि दादांचा 50 वर्षांचा संबंध आहे. दादा कार्यकर्ते होते. मी बारामतीला गेलो, तर माझी सगळी उठबस दादा पाहत होते. खूप आठवणी आहेत. जर दादांचा आज 75वा वाढदिवस साजरा करायला जमलो असतो, तर जास्त बरे वाटले असते.”

यावेळी उपस्थित होते माजी सरन्यायाधीश भूषण गवई, राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, तसेच राज्यातील सर्वपक्षीय नेते. उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांनी देखील उपस्थिती लावली. या वेळी अंबानी व अदानी एका बाजूला बसले होते, तर मध्यभागी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल बसले होते.

शोकसभेत उपस्थित नेत्यांनी अजित पवार यांच्या कार्याची आठवण करून दिली व त्यांच्या योगदानाबद्दल आदर व्यक्त केला. उद्योग, राजकारण आणि कला यातील दिग्गजांच्या उपस्थितीमुळे शोकसभेचा भव्य आणि ऐतिहासिक अर्थ प्राप्त झाला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!